अहमदनगर प्रतिनिधी (दि.३० जुन):-कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत नॉन बेलेबल वॉरंटची बजावणीची विशेष मोहीम राबवून कोतवाली पोलिसांनी १९ आरोपींना जेरबंद केले आहे.मा.न्यायालयाचे समन्स बजावणी करण्यात आलेले आरोपी हे न्यायालयात हजर न झाल्याने न्यायालयाने त्यांना नॉन बेलेबल वॉरंटचे आदेश केल्याने दि.१२/०६/२०२३,१७/०६/२०२३ व दि.२७/०६/२०२३ पर्यंत कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत विशेष वॉरंट बजावणी मोहीम राबवून १९ आरोपी अटक केले ९ आरोपींना स्वतः न्यायालयात हजर केले तर १४ आरोपींनी न्यायालयात हजर होऊन वॉरंट रद्द करून त्यांच्या पावत्या पोलीस स्टेशनला हजर केल्या.तसेच १० आरोपींचे जामीन कदबा भरून घेऊन न्यायालयात हजर केले.सदरची विशेष मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोसई/गजेंद्र इंगळे,पोसई/सुखदेव दुर्गे,पोना/रवींद्र टकले,पोना/अंकुश कासार,पोशि/सतीश शिंदे,पोशि/सागर दुशिंगे यांनी केली आहे.
