अहमदनगर प्रतिनिधी (दि.३० जुन):-कोपरगाव शहर पोलीसांनी पेट्रोल पंपावरील खुनाच्या गुन्हयातील आरोपींचा तपास करून चोवीस तासाच्या आत दोघांना बेड्या ठोकल्या,दि.२६ जुन रोजी सांयकाळी ०७.०० ते ०७.३० वाचे सुमारास कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील गुरुराज पेट्रोलपंप येथे फिर्यादी नामे अमोल धोंडीराम मोहीते वय २५ वर्षे, धंदा खाजगी नोकरी,मुळ रा.मांदुर्ण ता.चाळीगाव जि.जळगाव ह.रा.गुरुराज HP गैस एजेन्सी,संवत्सर शिवार ता.कोपरगाव जि. अहमदनगर व त्यांचे सोबत कुणाल इंगळे यांचे पेट्रोल व डिझेल भरण्याचे काम चालु होते.त्यावेळी काळया रंगाचे पल्सर मोटार सायकलवर तीन अज्ञात इसमांनी येवून त्यांचे एक इसमांनी विनाकारण यातोल फिर्यादी अमोल धोंडीराम मोहीते यांना धक्काबुक्की करुन कानाखाली मारली त्यावेळी ते पाहुन पेट्रोलपंपाचे मॅनेजर भोजराज बाबुराव घनघाव वय ४० वर्ष रा.दहेगाव बोलका ता.कोपरगाव जि. अहमदनगर हे कॅबीनमधुन बाहेर आले व फिर्यादीस मारहान करणारे अनोळखी इसमास तु माझ्या माणसाला का मारले बाबत विचारपुस केली असता,त्याला त्याचा राग आल्याने व त्याचे सोबत असलेले त्याचे इतर साथीदारांनी त्यास मारुन टाक सोडु नको असे म्हणाले तेव्हा त्या अनोळखी इसमांने मॅनेजर भोजराज बाबुराव घनघाव याची गचांडी धरून त्यास धारदार चाकुने पोटात व खांदयावर वार करून त्यांचेकडोल पल्सर मोटार सायकलवर बसुन पळुन केले होते.त्यामध्ये जखमी झालेल्या मॅनेजर भोजराज बाबुराव घनघाव यांना उपचारकामी साईबाबा सुपर हॉस्पीटल शिर्डी येथे दाखल असतांना तो मयत झाला होता.सदरची घटना घडले बाबत माहीती प्राप्त झाल्याने तात्काळ घटना टिकाणी जावुन पाहणी करुन सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता,सदरचा गुन्हा अनोळखी इसमांनी मोटारसायकलवर येवून केला असल्याचे निष्पन्न होत असल्याने नमुद अनोळखी तीन आरोपीचे शोधकामी दोन पथके तात्काळ तयार करुन शिर्डी व नाशिक येथे रवाना केले.झालेल्या घटने बाबत बाबत अमोल धोंडीराम मोहीते, वय २५ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, मुळ रा. मांदुर्णे ता.चाळीगाव जि.जळगाव ह.रा.गुरुराज HP गॅस एजेन्सी, संवत्सर शिवार ता. कोपरगाव जि. अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन तीन अनोळखी इसमाविरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु.रजि.नंबर ३१० / २०२३ भादवि कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.आरोपीचे शोधकामी तयार केलेले पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज वरुन आरोपींचे फेसबुक,इंस्टाग्रामवरुन फोटो प्राप्त करुन त्यांचे वास्तव्या बाबत गोपनीय माहीती प्राप्त करुन आरोपींचा शोध घेवुन शिर्डी येथुन एक व नाशिक येथुन एक असे दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले आहे.असुन त्यांचा एक साथीदार फरार झाला असल्याचे त्यांने सांगितले आहे.ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपीस गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता,त्यांनी सदरचा गुन्हा पेट्रोलपंपावर धक्काबुक्की करुन झालेल्या वादातुन केला असल्याची कबुली दिली आहे.नमुद दोन्ही आरोपीना अटक करुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे करीत आहेत.फरार झालेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती.स्वाती भोर मॅडम, श्रीरामपुर विभाग,उपविभागीय पोलीस अधीकारी श्री.संदीप मिटके, शिर्डी विभाग शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/रामराव ढिकले,पोउपनि/रोहीदास ठोंबरे,पोउपनि/ भरत दाते पोकॉ/652 जालींधर तमनर,पोकॉ/2622 संभाजी शिंदे, पोकॉ/1941 गणेश मैड, पोकॉ/2611 राम खारतोडे, पोकॉ/2563 गणेश काकडे, पोकों/मैद,पोकों/चव्हाण, पोकॉ/2461 बाळु घोंगडे, पोकों/1431 ज्ञानेश्वर भांगरे, पोकों/खंडेराव रहाने होमगार्ड गणेश लकारे,होमगार्ड अजय जाधव, होमगार्ड अविनाश गायकवाड,होमगार्ड सुभान शेख यांनी केलेली आहे.
