अहमदनगर प्रतिनिधी (दि.३० जुन):-कोपरगांव तालुका येथील अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करुन सात ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळु असा एकुण 42,20,000/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना यांना अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकाने कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन हद्यीत कारवाई करुन अवैधरित्या वाळु चोरी व वाहतुक करणा-या ठिकाणी छापा टाकुन एकुण 42,20,000/- (बेचाळीस लाख,विस हजार) रुपये किंमतीचा सात विविध कंपनीचे ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळु असा मुद्देमाल जप्त करुन १३ आरोपींविरुद्ध कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,श्री.संदीप मिटके उविपोअ शिर्डी विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोना/गणेश भिंगारदे,पोकॉ/रणजीत जाधव,रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे व किशोर शिरसाठ यांनी केली आहे.
