अहमदनगर प्रतिनिधी (दि.२ जुन):-कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं ७१७/२०२३ भादवि कलम ३९२,३६५,३४ प्रमाणे मधील फिर्यादी नामे विशाल विलास खळदकर (रा.नेप्ती नाका दातरंगे मळा ता.जि अहमदनगर)यांना दिनांक ३०/०६/२०२३ रोजी रात्रीच्या सुमारास अमरधाम जवळून दोन अनोळखी इसमांनी बिना नंबरच्या स्विफ्ट कारमध्ये फिर्यादी यांना जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण करुन फिर्यादी यांना जास्त गडबड करु नकोस नाहीतर तुला मारुन टाकू असा दम देवुन कल्याण बायपास रोडने दौंडरोड कडे आरणगावच्या पुढे नेले.व त्यांचे खिशातील मोबाईल फोन व रोख रक्कम जबदस्तीने काढून घेऊन त्यास अरणगाव रोडला सोडून देऊन सदरचे अनोळखी इसम निघून गेले अशा तक्रारीवरून वरील प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल केला.कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस जवान यांनी तात्काळ गुन्हयाची गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.आरोपी यांचा शोध सुरू केला.गोपनीय बाबतमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयातील आरोपी हे सध्या शेवगाव जि अहमदनगर येथे आहेत, त्यांनी गुन्हा केला आहे. त्यावरून मळेगाव ता.शेवगाव येथे टीम रवाना झाली.मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्याने नाव सागर नवनाथ निकम,धंदा शेती,रा. मळेगाव ता.शेवगाव जि. अहमदनगर सध्या रा.लोंढे नगर कल्याण रोड अहमदनगर असे सांगितले. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली देऊन सदरचा गुन्हा करण्यासाठी त्याचे सोबत एक विधीसंघर्षीत बालक असल्याची माहिती दिली. आरोपीचे ताब्यात एकुण २,३०,०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आला. त्यामध्ये तीन मोबाईल हॅण्डसेट व एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली.या गुन्हयाचा तपास पोसई मनोज महाजन हे करत आहे.सतिश संभाजीराव इखे वय 42 वर्षे धंदा ड्रायव्हर रा.पळसखेड ता.केज जि.बीड यास ४ दिवसांपूर्वी केडगाव परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटले होते.त्याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे.दि.२९/०६/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वा. चे सुमारास दोन अनोळखी इसमांनी नगरपालिका समोर पोलीस स्टेशन अंबाजोगाई जि.बीड येथे खोटे बोलून भाड्याच्या पोटी गाडी घेवून फिर्यादी सतिश संभाजीराव इखे वय 42 वर्षे धंदा ड्रायव्हर रा पळसखेड ता.केज जि.बीड यांच्या ताब्यातील स्विफ्ट गाड़ी ही भाड्याने लावुन घुमटवाडी ता.पाथर्डी पुढे काही अंतरावर गेल्यानंतर गाडी थांबवण्यास सांगून माझ्या बहिणीस घेवुन येतो असे म्हणून एक इसम गाडीच्या खाली उतरला. गाडीत बसलेल्या इसमाने माझ्या डोळ्यात चटणी टाकून गाडीतील खाली उतरलेल्या अनोळखी इसमाने गाडीतून खाली ओढुन धक्काबुक्की करून फिर्यदीचे खिश्यातील रोख रक्कम,व्हिवो कंपनीचा मोबाईल व स्विफ्ट गाडी हिसकावून घेवून गेले त्याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. केडगाव आणि पाथर्डी येथील दोन्ही गुन्हा केल्याची कबुली आरोपीने दिली असून चोरलेली स्विफ्ट गाडी जप्त करण्यात आली आहे.या प्रकारांमध्ये आणखी एक आरोपी निष्पन्न होत असून त्याचा ही शोध सुरू आहे.ही कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक,प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.चंद्रशेखर यादव,पोसई/ महाजन व पोना/शाहिद शेख,पोकॉ/प्रमोद लहारे,पोकॉ/सुमित गवळी,पोकॉ/दिपक रोहकले,यांनी तसेच सायबर सेलचे पोकॉ/नितीन शिंदे यांनी केली आहे.
