Maharashtra247

सोमठाणे नलवडे जिल्हापरिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी गिरवले कोडींगचे धडे

 

प्रतिनिधी (दि.६ जुलै):-जिल्हापरिषद अहमदनगर व कोड टू इनहांस लर्निंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हापरिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलवडे येथे विद्यार्थ्यांना संगणक विज्ञान आणि कोडींग बद्दल शिकवण्यासाठी दोन दिवसाची कार्यशाळा दि.3 व 4 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेचा आज समारोप झाला.या दोन दिवसीय कार्यशाळेमुळे जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्याा ज्ञानात अजून भर पडली आहे.हा कार्यक्रम खूप सर्जनशील,नियोजित आणि उत्तम होता.या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना थ्रीडी प्रिंटिंग सारख्या गोष्टी प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या.त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता खूपच वाढीस लागली.नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील कौशल्य आत्मसात करण्यासाठी हा कार्यक्रम नक्कीच उपयोगी ठरणार आहे. या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना विविध समस्या ओळखणे,ती समस्या त्या आपल्या सहकारी विद्यार्थ्यांसोबत सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आणि या समस्येचे स्वरुप कोडींगच्या स्वरूपातून मांडून आपल्या समस्या व्यक्त करण्यास मुलांना यामुळे संधी मिळाली.कोड ऑन व्हिल्स या प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक राहुल बांगर सर,प्रीती मॅडम व कांचन मॅडम यांनी दोन दिवस अथक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना शिकविले.कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना कोडींग बद्दल माहिती देऊन समस्येवर आधारित प्रोजेक्ट बनवण्याचा सराव देण्यात आला व विद्यार्थ्यांनी बनवलेला समस्यावर आधारित प्रोजेक्टचे प्रदर्शन दिनांक 4 जुलै 2023 रोजी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या पालक ग्रामस्थ व मान्यवर यांचे समोर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अमोल नलवडे,उपसरपंच श्री.अकाश दौंडे,सेवानिवृत्त शिक्षक श्री.दुर्योधन नलवडे,श्री.सुरेश शिंदे,श्री.गोरक्षनाथ सुपेकर,श्री.पोपट पवार यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page