पाथर्डी प्रतिनिधी(दि.८ जुलै):-संभाजीनगर तालुक्यातील दुधड येथील रहिवाशी व संभाजीनगर शहर येथे पोलीस पदावर कार्यरत आसलेले कृष्णा बोर्डे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हॉटेल मध्ये पार्टी जेवण,प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीसाठी विनाकारण होणारी पैश्याची नासाडी आणि या सर्वातून फल निष्पत्ती शुन्य असा निरर्थक आणि माणुसकी शुन्य वाढदिवस साजरा न करता समाजपयोगी आणि वंचित घटकांना काहीतरी दिलासा मिळेल किंवा हातभार लागेल असा वाढदिवस करण्याचे पोलीस शिपाई कृष्णा बोर्डे यांनी ठरविले व त्याच प्रमाणे त्यांनी संभाजीनगर येथुन थेट पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदुर येथील अनाथ-निराधार मुलांचे शिक्षण करनारे आजिनाथ दहिफळे यांना संपर्क करुन त्यांच्या अनाथ निराधार मुलांसाठी जवळपास 40 स्कुलबॅग,व अत्यावश्यक शालेय साहित्य आसे जवळपास 31 हजार रुपये किंमतीचे शालेय साहित्य घेवुन आपल्या मित्रपरिवारासह स्वतः दैत्यनांदुर येथे येवुन गावातील लहान मुलांसोबत केक कापुन आपला वाढदिवस साजरा केला व त्यांना मिठाई वाटप केली..यावेळी बोलताना समाज्याने आपन आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळुन समाज्यातील वंचित व निराधार घटकासाठी मदत करण्याचा प्रयत्न करावा आशी भावाना त्यांनी दैत्यनांदुर येथील ग्रामस्थांसमोर आपल्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केली व भविष्यात या मुलांच्या शिक्षणासाठी लागेल त्यावेळी योगदान देण्याचा प्रयत्न करील असेही ते म्हणाले.यावेळी गावातील उपस्थित आसनार्या सर्व प्रतिष्ठीत व्यक्तींनी त्यांच्या या कार्याचे कौतुक केले व या समाजात आपल्यासारखे खुप कमी लोक भेटतात आपल्याला नक्कीच या चिमुकल्यांचे आशिर्वाद पुढील जीवनासाठी भेटतील आशी प्रतिक्रीया व्यक्त केली. यावेळी या कार्यक्रमासाठी गावातील सोसायटीचे चेअरमन महादेव काकडे ग्रा.पं सदस्य बाळासाहेब वामन,प्रसिद्ध भारुडकार बंडुनाना खंबायत,विठ्ठल दौंड,संजय राख,सुधाकर खेडकर, सोमनाथ खेडकर व आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
