प्रतिनिधी:-मौजे यवत येथील डवरी गोसावी समाजातील एका कुटुंबाला,जात पंचायतीच्या पंचांनी वाळीत टाकुन त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे.यात ९ पंचाविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमीतील हकीकत आशिकी,यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे यवत इंदिरा नगर ता.दौंड जिल्हा पुणे येथील शोभाबाई राजाराम शिंदे व त्यांच्या कुटुंबातील सर्व लोकांना,डवरी गोसावी समाज जात पंचायतीच्या पंचांनी बहिष्कार टाकुन व दंडात्मक रक्कम ठेवून (वाण) वाळीत टाकले असल्याचा बेकायदेशीर प्रकार समोर आला आहे,या संदर्भात पीडित कुटुंबातील फिर्यादी, शोभाबाई राजाराम शिंदे,वय ५५ वर्ष जात हिंदू नाथपंथी डवरी गोसावी,रा.यवत इंदिरा नगर ता.दौंड जिल्हा पुणे, यांच्या तक्रारीवरून यवत पोलीस स्टेशन येथे गुरन ७७३/२०२३ भादविक ५०७ सामाजिक बहिष्कारा पासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम कलम ५-६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत इंदिरा नगर ता दौंड जिल्हा पुणे येथील राहत्या घरी दि,०२/०४/२०२३ रोजी दुपारी ४ वाजे दरम्यान डवरी गोसावी समाजातील पंच नाव:१)मोहन भगवान चव्हाण मु.पो.आरोळी वस्ती, जामखेड,ता.जामखेड जि.अहमदनगर (प्रमुख पंच) २)नारायण अर्जुन सांवत रा. ब्राम्हणी,ता.राहुरी जि.अहमदनगर (प्रमुख पंच) यांनी ३)भगवान शंकर चव्हाण ४)भाऊराव सिताराम शिंदे ५)रणजित मोहन चव्हाण सर्व रा.मु.पो. आरोळीवस्ती,जामखेड,ता. जामखेड जि.अहमदनगर (पंच) ६) तानाजी अर्जुन सांवत ७)नाथा अर्जुन सांवत ८)नामदेव अर्जुन सांवत सर्व रा.ब्राम्हणी,ता.राहुरी जि.अहमदनगर (पंच) ९) गंगाराम रावजी चव्हाण रा.हांडी निमगाव ता.नेवासा जि.अहमदनगर,इंदीरा नगर येथे फिर्यादीच्या राहते घरासमोर डवरी गोसावी समाजांतील जात पंचायतीचे कारभारी इसम नामे १)मोहन भगवान चव्हाण २)नारायण अर्जुन सांवत यांना फिर्यादीने दोन मुलीचे लग्न जमविण्यासाठी ८० हजार रुपये दिले होते,मात्र डवरी गोसावी समाजातील पंच मोहन भगवान चव्हाण व नारायण अर्जुन चव्हाण,यांनी नवरदेव न पाहिल्यामुळे त्यांना दिलेले ८० हजार रुपये फिर्यादीने परत मागितलेच्या कारणा वरून,त्यांनी डवरी गोसावी समाजातील जात पंचायतीच्या लोकांना व इतर पंचाना एकत्रित बोलवून जात पंचायत भरवुन त्यामध्ये फिर्यादी शोभाबाई राजाराम शिंदे व त्यांच्या कुटुंबा विरुद्ध बनाव करून अपमानास्पद वागणूक देऊन अन्यायकारक बेकायदेशीर बहिष्कार टाकत दंडात्मक रक्कम लादण्यात आली असल्याने तसेच (पंच) आरोपींनी जात पंचायतीमध्ये विडा उचलून,१२ रु,१ रु,५ रु, २५ रु,६० रु, ३५० रु, असे ऐकून ४५३ रु,दंड करुन, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना वाण (वाळीत) टाकलेच्या कारणावरून तसेच डवरी गोसावी समाजातील जात पंचायतीच्या पंचांनी भारतीय राज्यघटनेतील कायदा व सुव्यवस्थेचा अनादर करुन, जाती रूढी परंपरा रुजवण्याचा घाट असल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून जात पंचायतीचे कारभारी पाटिल व पंच आरोपी विरुद्ध यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास अंमलदार नगरे करीत आहेत.
