अहमदनगर प्रतिनिधी (दि.१३ जुन):-दि.११ जुलै रोजी कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की,अहमदनगर शहरातील दौंड रोड वरुन एक विना क्रमांकाचा टाटा एंट्रा चारचाकी मालवाहतुक टेम्पो यामध्ये कोठुन तरी शासकिय योजनेतील कुपनचा रेशनचा गहु धान्य विक्री करणे करीता घेवून येणार आहे व ती अहमदनगर शहरात खाली करणार आहे अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शन गुन्हे पथकाचे पोसई मनोज कचरे हे त्यांचे पथकासह कायनेटीक चौक परिसरातील थांबुन खात्री केली असता दौन्ड रोडने एक विना क्रं चा एक टाटा इन्ट्रा टेम्पो रोडने आली ती थांबवून तीची पाहणी केली असता त्या वाहनामध्ये वाहन चालक नामे लक्ष्मण अनिल कासार हा मिळून आला व त्याचे गाडीच्या केबीन मध्ये दोन नंबर प्लेटा,काही शासकीय धान्य वितरण योजनेतील अन्न धान्याचे रिकामे बारदाणे गोणपाट व मागील हौद्यात पांढरे रंगाचे बारदाणा असलेले पोते त्यामध्ये रेशनचा गोणी पल्टी केलेला गहु,व काही पोत्यात मका,ज्वारी, हरबरा असे धान्य वाहनात भरलेला मिळुन आले. त्यातील गहु हे धान्य शासकीय स्वस्त अन्न धान्य वितरण योजनेतील असल्याची पुरवठा निरीक्षक यांची देखील खात्री झाल्याने आरोपी नामे लक्ष्मण अनिल कासार (वय २०.वर्ष रा. देवळगाव रोड वाळकी ता.जि अहमदनगर) याचे वर कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोकॉ/सुजय हिवाळे यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा रजिक्रं ७५९/२०२३ अत्यावश्यक वस्तु कायदा कलम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, पोसई/मनोज कचरे,पोहेकॉ/ तनवीर शेख,पोहेकॉ/ओटी, पोहेकॉ/गणेश धोत्रे,पोना/ योगेश भिंगारदिवे,पोना/गोरख काळे,पोना/रियाज इनामदार,पोना/योगेश खामकर,पोना/सलिम शेख, पोकॉ/संदिप थोरात,पोकॉ/ कैलास शिरसाठ,पोकॉ/ सोमनाथ राऊत,पोकॉ/अमोल गाडे,पोकॉ/सुजय हिवाळे, पोकॉ/सागर मिसाळ,पोकॉ/ अतुल काजळे यांनी केली आहे.
