अहमदनगर प्रतिनिधी (दि.१३ जुलै):-एटीएम फोडणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.09 जुलै रोजी फिर्यादी श्री.प्रशांत अशोक साळवे(वय 36,धंदा नोकरी शाखा प्रबंधक बॅक ऑफ महाराष्ट्र वाकोडी फाटा,अहमदनगर) यांचे बॅक ऑफ महाराष्ट्र वाकोडी फाटा येथील एटीएम जवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांचे कडील विना नंबर कारमध्ये सिल्व्हर रंगाची मारुती सुझूकी कंपनीची स्विफ्ट कारमध्ये येवुन गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कट करुन मशिनमधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी यांचे तक्रारी वरुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 426/2023 भादविक 379, 511,427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.ही घटना घडल्यानंतर श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर,स्थागुशा,यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांची दोन पथके नेमुण गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बॅक ऑफ महाराष्ट्रा येथील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कट करुन चोरी करणारे रेकॉर्ड वरील आरोपींचा राहुरी परिसरात शोध घेताना पथकास एक सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार भरधाव वेगाने जाताना दिसली.पथकाने लागलीच संशयीत भरधाव कारची माहिती पोनि/श्री. दिनेश आहेर यांना कळविले. पोनि/श्री.आहेर यांनी पथकास सदर कारचा पाठलाग करण्यास सांगितले व दुसरे पथकास नगर मनमाड रोडने जावुन कारचा शोध घेणे बाबत कळविले.पथक एमआयडीसी,विळद परिसरात संशयीत वाहनाचा शोध घेताना सदर वाहन बायपास रोडने जाताना दिसले.पथकाने खातगांव टाकळी गांवचे शिवारात ताब्यातील वाहन स्विफ्ट कारला आडवे लावुन थांबबली व कार मधील दोन संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)अजित अरुण ठोसर वय 22, रा.मातकुळी, ता.आष्टी,जिल्हा बीड हल्ली रा.पंम्पींग स्टेशन,साईनगर, ता.संगमनेर व 2) जमीर जाफर पठाण वय 21,रा. खांडगांव,ता.संगमनेर असे सांगितले.पंचासमक्ष त्यांचे कारची झडती घेता कारमध्ये ऑक्सीजन सिलेंडर,भारतगॅस कंपनीची टाकी,पेंट स्प्रे, गॉगल, स्टील रॉड,निळे व लाल रंगाचा पाईप,रेग्युलेटर, नोझल,ऍ़डजस्टेबल पक्कड व ओप्पो कंपनीचा मोबाईल मिळुन आल्याने त्याना या बाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले.त्यांना विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार नामे रविंद्र चव्हाण व शुभम मंजुळे दोन्ही रा.खडकी, ता. कोपरगांव यांचे सोबत मिळुन चोरी केल्याची माहिती दिल्याने त्यांना ताब्यात घेतले व आरोपींचे साथीदाराचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 3)रविंद्र वाल्मिक चव्हाण वय 32,4) शुभम पोपटराव मंजुळे वय 25 दोन्ही रा खडकी, ता. कोपरगांव असे असल्याचे सांगितले.ताब्यात घेतलेल्या चारही आरोपीस आणखी कोठे कोठे व किती ठिकाणी चोरीचे गुन्हे केले याबाबत विचारपुस करता त्यांनी भिंगार,राहुरी जिल्हा अहमदनगर,वैजापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर, सातारा,जिल्हा छत्रपती संभाजीनगर व अंभोरा, जिल्हा बीड परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. हे दोन्ही आरोपी सराईत असून त्यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक व श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री.अनिल कातकाडे उविपोअ,नगर शहर विभाग,श्री.संदीप मिटके उविपोअ शिर्डी विभाग अति.प्रभार श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोसई/तुषार धाकराव,सोपान गोरे,सफौ/बाळासाहेब मुळीक,अतुल लोटके,संदीप पवार,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,संतोष लोढे,संदीप दरदंले,भिमराज खर्से,गणेश भिंगारदे,फुरकान शेख,पोकॉ/सागर ससाणे,मच्छिंद्र बर्डे,अमृत आढाव,बाळु गुंजाळ,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड,सफौ/भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/बबन मखरे,पोना/ज्ञानेश्वर शिंदे,चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांनी केली आहे.
