अहमदनगर प्रतिनिधी (दि.१३ जुलै):-सुझलॉन कंपनीचे टॉवरची कॉपर वायर चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले,बातमीची हकिगत अशी की,फिर्यादी श्री.संतोष भिका लंके (वय 45,धंदा खाजगी नोकरी,रा.हंगा,ता. पारनेर) हे नोकरीस असलेल्या सुझलॉन कंपनीचे शहाजापुर शिवारातील टॉवरची 71,000/- रुपये किंमतीची कॉपर वायर अनोळखी चोरट्याने चोरुन नेली होती.या घटनेबाबत सुपा पोस्टे गुरनं 256/23 भादविक 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर स्थागुशा यांना चोरीचे गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन तात्काळ पथक रवाना केले.पथक पारनेर,सुपा परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,हा गुन्हा इसम नामे श्रीकांत जाधव याने त्याचे साथीदारासह केला असुन चोरी केलेली कॉपर वायर घेवुन नारायणगव्हाण शिवारातील चौधरी ढाब्या जवळ उभा आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले.पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करता एक संशयीत इसम गोणी घेवुन उभा असलेला दिसला.पथकाने संशयीता ताब्यात घेवुन पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)श्रीकांत नामदेव जाधव,वय 28,रा.पळवे बु, ता.पारनेर असे सांगितले. त्याची पंचा समक्ष अंगझडती घेता गोणीमध्ये जळालेली कॉपर वायर मिळुन आली. सदर कॉपर वायर बाबत विचारपुस करता त्याने शहाजापुर शिवारातील सुझलॉन कंपनीचे टॉवरची कॉपर वायर त्याचे साथीदार नामे 2)सुनिल जाधव (फरार) व 3)बाबु तराळ,दोन्ही रा.शहाजापुर,ता.पारनेर (फरार) अशांनी मिळुन चोरी केली असुन ती विक्री करण्यासाठी जात आहे असे सांगितल्याने.आरोपीस 35,000/- रुपये किंमतीची 50 किलो कॉपर वायरसह ताब्यात घेवुन सुपा पोस्टे येथे हजर केले आहे. पुढील तपास सुपा पोस्टे करीत आहे.ही कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक व श्री.संपत भोसले उविपोअ नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे सफौ/भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे,शरद बुधवंत, पोना/रविंद्र कर्डीले,पोना/सचिन आडबल,विजय ठोंबरे यांनी केली आहे.
