अहमदनगर प्रतिनिधी(दि.१३ जुलै):-अट्टल मोटर सायकल चोराला 2,55,000/-रु. किं.च्या मोटरसायकल सह पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे.तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुरनं/979/2023 भादंविक 379 प्रमाणे दि.9 जुलै रोजी दाखल होता.यातील फिर्यादी यांची होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल नं एमएच.16 ,बीएन.5875 हि दि.09 जुलै रोजी नगर मनमाड रोडवरील डि.मार्ट, समोरील रस्त्यावरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याबाबत पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपीचा शोध घेत असताना गुप्त तोफखाना पोलीस स्टेशन निरीक्षक मधुकर साळवे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,आरोपी नामे किशोर जयसिंग पठारे वय 40 वर्षे रा.पिंपळगांव माळवी ताजि.)अहमदनगर हा एक चोरीची मोटर सायकल घेवुन फिरत आहे.त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचुन भिस्तबाग चौक या ठिकाणी सापळा रचत किशोर जयसिंग पठारे यास ताब्यात घेवून त्याच्या कडुन सहा मोटार सायकल जप्त केल्या.ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अनिल कातकाडे यांचे सुचना व मार्गदर्शखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे तोफखाना तपास पथकामधील सपोनि/नितिन रणदिवे,पोउपनिरी/समाधान सोळंके,पोहेकॉ/दत्तात्रय जपे, पोहेकॉ/सुनिल शिरसाठ,पोना/अविनाश वाकचौरे,पोना/वसिम पठाण, पोना/अहमद इनामदार,पोना/ सुरज वाबळे,पोना/संदिप धामणे,पोकॉ/सतिष त्रिभुवन, पोकॉ/शिरष तरटे,पोकॉ/सचिन जगताप,पोकॉ/गौतम सातपुते,पोकॉ/दत्तात्रय कोतकर,पोकॉ/सतिष भवर,पोकॉ/गौतम सातपुते,पोकॉ/ संदिप गि-हे यांनी केली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सफो/अनिल भोसले हे करत आहेत.
