अहमदनगर प्रतिनिधी (दि.१३ जुलै):-अहमदनगरच्या युवकांनी केले केदारनाथ येथे मदतकार्य दरड कोसळून नऊ तास झाला होता रस्ता ठप्प नगरच्या युवकांनी आपल्या जीवाची परवा न करता धावले मदतीला,अहमदनगर तालुक्यातील वाळकी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज भालसिंग व त्यांचे सहकारी उत्तराखंड मधील केदारनाथ यात्रेला जात असताना पावसामुळे रुद्रप्रयाग ते सोनप्रयाग मार्गामध्ये दरड कोसळली व यामध्ये अनेक भाविक जखमी झाले.त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले व रस्ता पूर्णपणे बंद पडला व रात्री उशिरा शासकीय मदत भेटत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक मनोज भालसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथील लोकांना मदतीला घेऊन मध्यरात्री स्वतःच्या जीवाची परवा न करता कोसळलेली दरड मोठे दगड बाजूला सरकून नऊ तासानंतर रस्ता मोकळा केला. त्यानंतर रस्ता मोकळा करून तेथील वाहतूक सुरळीत करून दिली.त्यानंतर शासकीय मदत उपलब्ध होऊन स्थानिक पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज भालसिंग व त्यांचे सहकारी दीपक बोठे,गणेश बोठे, राजेंद्र आव्हाड यांचे आभार मानले.
