आष्टी प्रतिनिधी(गोरख निकाळजे):-अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडचा रहिवासी असणारा विवेक विकेंद्र सदाफुले याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीच्या जोरावर चिकाटीने मंत्रालयात लिपिक या पदावर नियुक्त होण्याचा बहुमान पटकावला आहे.विवेक सदाफुले याने घरच्या अत्यंत बिकट व प्रतिकुल परिस्थितीवर मात करून आपल्या अभ्यासाच्या व कष्टाच्या जोरावर एम.पी.एस सीच्या मार्फत एससी जनरल मधुन पंधराव्या क्रमांकावर येत मंत्रालयात लिपिक या पदावर नियुक्त होण्याचा दैदिप्यमान बहुमान मिळवुन समाजाप्रती एक आदर्श निर्माण करण्याचा जो मान मिळवला तो समाजातील तरुणांना नक्कीच दिशादर्शक ठरेल.आज जामखेड शहरात विवेकचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला व तसेच कडा येथील त्यांचे मामा व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे दिपक गरुड यांनी त्यांचा भव्य सत्कार केला व सत्कार प्रसंगी उपस्थित असणारे कार्यकर्ते राजु गायकवाड,सुकेंद्र सदाफुले,शैलेश सदाफुले व अभिषेक गरुड यांनी विवेकच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत शुभेच्छांचा वर्षाव करून त्याचे कौतुक केले.
