प्रतिनिधी(दि.१४ जुलै):-घरात आलेल्या कोंबड्या हुसकावून लावल्याने सुनेने सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील हाळदेवस्ती साकुर येथे घडली आहे.ही घटना येथे ७ जून रोजी घडली.याबाबत १२ जुलै रोजी जिल्हा रुग्णालय नगर येथे सासूचा जबाबा वरून सुनेविरुद्ध घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी सुंदरबाई दत्तू भुतांबरे (वय ५५ वर्षे,रा. हाळदेवस्ती,साकुर,ता. संगमनेर,जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या जबाबावरून शिल्पा दीपक भुतांबरे व शीतल (पूर्ण नाव माहीत नाही.) दोन्ही रा.हाळदेवस्ती साकुर,ता.संगमनेर यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोहेकॉ/ जी.पी.लोंढे हे करीत आहेत.
