विजेचा धक्का लागल्याने मायलेकीचा मृत्यू
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५.डिसेंबर):-धुतलेले कपडे घरातील तारेवर वाळत टाकताना तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या आईलाही विजेचा धक्का बसला यात दोघींचाही मृत्यू झाला आहे.निर्मला रमेश कुसळकर (वय ४०) व निकिता अमोल मनोरे (वय २२,दोघी रा.वडार वाडा,सोनई) या मायलेकीचा मृत्यू झाला आहे .