अवैधरित्या दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला तब्बल २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२० जुलै):-अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करणारे दोन आरोपी 27,44,160/-रुपये किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद करण्यात आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन अवैध धंद्याची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या.पथक अहमदनगर शहर परिसरात फिरुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना दि.19 जुलै रोजी पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,एका आयशर कंपनीचे विटकरी रंगाचे टेम्पोमधुन गोवा राज्यातुन विदेशी कंपनीची दारु महाराष्ट्रात विक्रीचा परवाना नसताना विना परवाना बेकायदेशिरित्या नगर कल्याण रोडने अहमदनगर कडे येत आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले व पथकास तात्काळ रवाना केले. पथकाने नगर कल्याण रोडने जावुन नेप्ती नाक्याजवळ सुमारास सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात एक विटकरी रंगाचा आयशर टेम्पो येताना दिसला. पथकाची खात्री होताच त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करता चालकाने टेम्पो रस्त्याचे कडेला उभा केला. त्यावेळी गाडीचे केबिनमध्ये दोन इसम बसलेले पथकास दिसले.त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन, आयशर टेम्पोची पाहणी करता टेम्पोमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विदेशी दारुचे बॉक्स असल्याची खात्री होताच. दोन्ही इसमांना विदेशी दारु वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपुस करता त्यांनी वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)बाबु लखुभाई राठोड, रा.राजकोट,राज्य गुजरात व 2) सिध्देश संदीप खरमाळे रा. भांडगांव,ता.पारनेर असे सांगितले.ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन 3,45,600/- रुपये किंमतीचे मॅकडॉल्स व्हीस्की 180 मिलीचे 48 बाक्स, 3,45,600/- रुपये किंतीचे मॅकडॉल्स व्हीस्की 750 मिलीचे 48 बाक्स, 1,90,080/- रुपये किंमतीचे रॉयल स्टँग 180 मिलीचे 22 बाक्स,1,90,080/- रुपये किंमतीचे रॉयल चॅलेज 750 मिलीचे 22 बाक्स, 1,72,800/- रुपये किंमतीचे रॉयल चॅलेज 180 मिलीचे 20 बाक्स व 15,00,000/- रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा विटकरी रंगाचा टेम्पो असा एकुण 27,44,160/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 1050/23 मपोकाक 65 (अ) (ई), 80, 83, 90 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे,मनोहर गोसावी,अतुल लोटके,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले, पोना/सचिन आडबल,विजय ठोंबरे,संतोष लोढे,संदीप दरदंले,संतोष खैरे,फुरकान शेख,पोकॉ/रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे,किशोर शिरसाठ,अमृत आढाव, मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड अशा यांनी केलेली आहे.