Maharashtra247

मशीनद्वारे सुगंधी तंबाखू व सुपारी बारीक करून मावा तयार करणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांची कारवाई;सुपारी फोडण्याच्या मशीनसह एक लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२० जुलै):-सुगंधी तंबाखू व सुपारी बारीक करण्याची मशीन कोतवाली पोलिसांनी जप्त केली आहे.शहरातील झेंडीगेट परिसरातील सैदु कारंजा मस्जीद जवळ ही कारवाई करण्यात आली असून,एक लाख ३८ हजार ६०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मशीनद्वारे सुगंधी तंबाखू व सुपारी बारीक करून मावा तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकाला सूचना दिल्या आहेत.फयाज इलियास शेख (वय २१ वर्ष, रा.कोठला झोपडपट्टी, अहमदनगर), सुफीयान नासीर शेख,(वय २० वर्ष, रा. बड़ी मस्जीद जवळ, मुकुंदनगर,अहमदनगर) या दोघांवर कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झेंडीगेट परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधीत तंबाखु व सुपारी बारीक करून प्रतिबंधित मावा विक्री केला जात असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना गुप्तबातमीदारा मार्फत मिळाली होती.कोतवाली पोलिसांनी दोन पंचासोबात २० जुलै २०२३ रोजी सापळा लावून छापा टाकला.या कारवाईत एक लाख ३० हजार रुपये किमतीची सुपारी फोडण्याचे लोखंडी मशीन,तीन हजार ६०० रूपये किमतीची सुगंधी तंबाखुचे सिल्व्हर रंगाचे १८ पाकीट,पाच हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रीक वजन काटा असा एक लाख ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,उपनिरीक्षक मनोज कचरे,शाहीद शेख,रविंद्र टकले,दिपक रोहकले,सुमित गवळी,प्रमोद लहारे यांनी ही कारवाई केली.

You cannot copy content of this page