ॲट्रॉसिटी गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अहमदनगर प्रतिनिधी(दि.२० जुलै):-तोफखाना पोलीस ठाण्यात गुरजिनं 754/2023 भादंविक 323,504 तसेच अनुसुचित जाती जमाती अधिनिमयम कलम 3(1), ( R ), ( E ) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी असीम हमीद शेख (वय 25 वर्षे रा.रामवाडी) हा ॲट्रॉसिटी गुन्हयात दोन महिन्यापासुन फरार होता.पोलिसांनी त्याचा वेळोवेळी शोध घेतला परंतु तो पोलीसांना हुलकावणी देत होता.दि.20 जुलै 2023 रोजी पोलीस उपनिरीक्षक/समाधान सोळंके यांना गोपनीय माहीतीदवारे समजले कि,सदरील आरोपी हा रामवाडी परिसरात येणार आहे अशी माहीती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी जावुन त्या ठिकाणी सापळा लावुन आरोपीस शिताफिने जेरबंद केले.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अनिल कातकडे,पोलीस निरीक्षक मधुकर साळवे तोफखाना पो.स्टे. यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सपोनि/नितिन रणदिवे,पो.उप.नि/समाधान सोळंके,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाठ,पोना/ अविनाश वाकचौरे,अहमद इनामदार,वसिम पठाण,संदिप धामणे,सुरज वाबळे,पोकॉ/सचिन जगताप, शिरीष तरटे,दत्तात्रय कोतकर,पोकॉ/सतिष त्रिभुवन,संदिप गि-हे,सतिष भवर,गौतम सातपुते अशांनी केली आहे.