स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई या तालुक्यात टाटा सुमो गाडीतून तब्बल नऊ लाख रुपयाचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२१ जुलै):-जामखेड तालुक्यातील कुसडगांव शिवार येथुन महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला गुटखा,पान मसाला व सुगंधी तंबाखु बेकायदेशिररित्या कब्जात बाळगुन वाहतुक करणारे दोघे आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांचे पथक नेमुन जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन,खात्री करून कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने दि.२० जुलै २०२३ रोजी जामखेड तालुक्यातील कुसडगांव शिवारात पांढरे रंगाचे सुमो गाडीत गुटखा,पानमसाला व सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणा-या आरोपी विरुध्द कारवाई करुन त्यांचे कब्जात ९,४७,८४०/- रुपये किंमतीचा विविध प्रकारचा गुटखा,पानमसाला,सुगंधी तंबाखु व एक पांढरे रंगाची सुमो गाडी असा मुद्देमाल जप्त केला.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत अधिक विचारपुस करता त्यांनी सदरचा माल हा अळंगा,कर्नाटक राज्य येथील शेट्टी याचे कडुन खरेदी केल्याचे सांगितल्याने आरोपी विरुध्द जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पकडलेले दोघे आरोपीचे नावे पुढीलप्रमाणे
१) सुलतान उमर कुरेशी,वय २९,रा.खर्डा रोड, ता.जामखेड
२)फजल उमर कुरेशी वय २३,रा.खर्डारोड,ता.जामखेड
३)शेट्टी रा.अळंगा राज्य कर्नाटक हा (फरार) आहे.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री. विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोना/सचिन आडबल,संतोष खैरे,पोकॉ/रणजीत जाधव,शिवाजी ढाकणे व रोहित मिसाळ यांनी केलेली आहे.