Maharashtra247

नगर सायबर पोलीस ठाण्यातील या तीन कर्मचाऱ्यांनी न्यू लॉ कॉलेज अहमदनगर या विधी महाविद्यालयातून विधी विभागाची (LLB) च्या पदवी परीक्षेत मिळविले यश

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२१ जुलै):-अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील सायबर पोलीस स्टेशन येथील कार्यरत असणारे पोलीस नाईक अभिजित अरकल,पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू,महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रितम गायकवाड यांनी न्यू लॉ कॉलेज अहमदनगर या विधी महाविद्यालयातून विधी विभागाची (LLB) या ३ वर्षाची पदवी परीक्षेत यशस्वी होऊन पदवी प्राप्त केली आहे.त्यांच्या या यशाबद्दल अहमदनगर पोलीस दलातील सायबर पोलीस ठाणे/स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,पोलीस उपनिरीक्षक सचिन रनशेवरे तसेच न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथील प्राध्यापक ॲड.तांबे सर,शिंदे सर,पांढरे सर,सुनील जाधव सर,केदार सर,वराट सर,राकेश बोगा सर,अतुल म्हस्के सर,हिंगडे सर,भवाल सर,पूनम वडेपेल्ली मॅडम,सांगळे मॅडम,खुळे मॅडम,मते मॅडम,जाधव मॅडम,मोरे सर यांनी यशस्वी झालेल्या अहमदनगर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page