अहमदनगर प्रतिनिधी (दि.२१ जुलै):-यवतमाळ जिल्ह्यातील दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील 6 फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद,बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी नयन अनिल केवटे (रा. हनुमंतबाबा मंदीरा जवळ, विटाळवार्ड,ता.पुसद,जिल्हा यवतमाळ) यांचे कुटूबिंयाना गांवातील पवन वाळके व त्याचे इतर साथीदारांनी किरकोळ वादावरुन कोयता व चाकुने मारहाण करुन गंभीर जखमी केले व फिर्यादीचे चुलते 1)राहुल हरीदास केवटे व चुलत भाऊ 2) क्रिश विलास केवटे यांना जिवे ठार मारले आहे.या घटने बाबत पुसद शहर पोलीस स्टेशन जिल्हा यवतमाळ गु.र.नं. 476/2023 भादविक 302,307,143, 144,147,148,149,294 सह अ.जा.ज.अ.प्र.का.क. 3 (2) (व्हीए), 3 (2) प्रमाणे आरोपी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासुन गुन्ह्यातील आरोपी महिंद्रा कंपनीचे मालवाहु टेम्पो मधुन फरार झाले होते.पुसद शहर पोलीस स्टेशन फरार आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेत असताना आरोपी हे छत्रपती संभाजी नगर मार्गे अहमदनगरच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधिक्षक यवतमाळ यांनी श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक अहमदनगर यांना संपर्क करुन आरोपी व गुन्ह्याबाबत माहिती कळविली.श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचे पथक नेमुन वरील प्रमाणे दाखल खुनाचे गुन्ह्यातील फरार आरोपींना ताब्यात घेवुन आवश्यक कारवाई करणे बाबत आदेश दिले.पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन अहमदनगर ते छत्रपती संभाजी नगर रोडने जावुन सापळा लावुन आरोपींना ताब्यात घेणे बाबत सुचना व मार्गदश केले.पथकाने दि. 20 जुलै 2023 रोजी अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर रोडने, वांबोरी फाटा येथे जावुन सापळा लावुन थाबंलेले असताना थोडाच वेळात एक महिंद्रा कंपनीचा मालवाहु टेम्पो येताना दिसला.पथकाची खात्री होताच टेम्पो चालकास थांबण्याचा इशारा करताच त्याने टेम्पो रस्त्याचे कडेला घेतला.टेम्पोतील इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)पवन बाजीराव वाळके वय 23, 2) निलेश दिपक थोरात वय 24,3) गोपाल शंकर कापसे,वय 26,4) गणेश संतोष तोरकड,वय 21, 5) गणेश शंकर कापसे,वय 24, 6)अवि अंकुश चव्हाण, वय 22, सर्व रा.विटाळवार्ड, ता.पुसद,जिल्हा यवतमाळ असे असल्याचे सांगितले. नमुद संशयीताकडे विचारपुस करता त्यांनी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा केल्याचे कबुल झाल्याने त्यांना महिंद्रा कंपनीचे मालवाहु टेम्पोसह ताब्यात घेवुन पुसद शहर पोलीस स्टेशन जिल्हा यवतमाळ यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पुसद शहरपोलीस स्टेशन जिल्हा यवतमाळ करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/संदीप पवार,अतुल लोटके,देवेंद्र शेलार,शरद बुधवंत,पोना/ रविंद्र कर्डीले,विजय ठोंबरे, फुरकान शेख,विशाल गवांदे, अमृत आढाव,रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड यांनी केलेली आहे.
