अहमदनगर प्रतिनिधी(दि.२२ जुलै):-अहमदनगर जिल्ह्यामध्ये मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा गुंडाराज सुरू असल्याची घटना आता समोर आली आहे.
पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभुळगाव येथील महिला सरपंच ज्योती संतोष घोरपडे यांच्यावर प्राणघात हल्ला झाला आहे.ही घटना आज शनिवारी दि.२२ जुलै रोजी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे.या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून गाव दहशतीखाली आलेले आहे.एका टोळी कडून धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून सदर घटनेत त्यांचे पती संतोष घोरपडे,दिर बापू घोरपडे,सासरे भाऊसाहेब घोरपडे,रोहित घोरपडे,रोहन घोरपडे,जाव वनिता घोरपडे हे संपूर्ण कुटुंब गंभीर जखमी झाले आहे.अद्यापही पोलीस प्रशासनाने या घटनेची दखल घेतली नसल्याचा आरोप सरपंच घोरपडे यांनी केला आहे.तर याआधी देखील माझ्या कुटुंबीयांवर याच गावगुंडांनी अनेकदा हल्ले केल्याचे त्यांनी सांगितले.तसेच या टोळीवर पाथर्डी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.या सर्व जखमींवर नगर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.
