अहमदनगर प्रतिनिधी (दि.२३ जुलै):-महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुनर्बांधणी दौऱ्यावर अहमदनगर मध्ये मनसे नेते अमित ठाकरे व मनसे वरिष्ठ नेते आले असता महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना अहमदनगर जिल्हयाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री.अमित ठाकरे,अखिल चिञे,संदिप पाचंगे यांचा माथाडी कामगार सेना अहमदनगरच्या वतीने अविनाश पवार यांनी शासकीय विश्रामगृह नगर येथे सत्कार केला.अमित ठाकरे यांनी कामगारांच्या समस्या-सुरक्षीतेच्या दृष्टीने तसेच कामगारांना अडचणी मध्ये मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपण कामगारांच्या न्याय हक्कासाठी कशा प्रकारे कामं करायला हवे या संदर्भात माहिती दिली व समस्या समजून घेऊन चर्चा केली यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ,देवीदास खेडकर,सुमित वर्मा,नितीन भुतारे,नितीन म्हस्के,मारुती रोहकले,बाळासाहेब माळी,सतीश म्हस्के,संतोष शिंदे,नारायण नरवडे,रवी रासकर,बंडू बनकर,बाबासाहेब म्हांडुळे यांच्यासह पदाधिकारी आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
