अहमदनगर प्रतिनिधी (दि.२३ जुलै):-श्री साई इंग्लिश मिडियम स्कूल व ज्यूनिअर कॉलेज मध्ये नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन नगर रचनाकार वर्ग 1 गट ब या पदावर नियुक्त झालेले चि.साहील अशोक कानडे तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 12 वा आलेला चि.समर्थ राहूल गागरे यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अशोकजी कानडे तसेच समर्थ गागरे याचे पालक,एज्यु. डायरेक्टर श्री.अर्जुन राठोड सर प्रिन्सिपल सौ.तनुजा रणमोडे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला राजमाता जिजाऊ व सावित्री बाई फुले प्रमुख यांचे: प्रतिमापूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख शिक्षिका तंझीला शेख यांनी करून दिली.चि. साहील कानडे व अशोकजी कानडे यांचा एज्यु.डायरेक्टर श्री.अर्जुन राठोड सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला चि.समर्थ व श्री गागरे सर यांचा सत्कार श्री.कानडे सरांच्या ‘हस्ते करण्यात आला उपस्थित सौ.गागरे मॅडम यांचा सत्कार प्रिन्सिपल सौ तनुजा रणमोडे यांच्या हस्ते करण्यात आला.या सत्कार समारंभानंतर शाळेतील शिक्षिका सौ.प्रज्ञा भागवत यांनी चि.साहील व समर्थचे तसेच मार्गदर्शक शिक्षिकांचे अभिनंदन केले.तसेच शाळेत स्पर्धा परीक्षा,स्कॉलरशिप परीक्षा व त्यासारख्या इतर परीक्षांचे विषय शिक्षिका कशा प्रकारे तयारी करून घेतात तसेच सराव परीक्षा घेतात त्यामुळे विद्यार्थी परीक्षेला पूर्ण सज्ज राहतो. विदयार्थ्याची चांगली तयारी होते व योग्य गुणांनी तो पास होतो.असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले व मार्गदर्शक शिक्षिकांचे तसेच समर्थ व साहील त्यांच्या कुटूंबियांचे देखील अभिनंदन केले.चि.साहील याने आपल्याला मिळालेले यश आपल्या मेहनतीमुळे मिळाले आवडी निवडीचा विचार न करता ध्येयावर लक्ष केंद्रित केले तसेच काका आमदार लहू कानडे व भाऊ संग्राम कानडे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.चि.समर्थ ने देखील आपल्या भाषणातून आपल्या मार्गदर्शक शिक्षिकांचे आभार मानले.याप्रसंगी समर्थचे वडिल श्री. राहूल गागरे यांनी देखील सर्वांचे अभिनंदन केले तसेच इंग्रजी शाळांचे नाव स्कॉलरशिप राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत दिसत नाही परंतु श्री साई इंग्लिश मिडियम स्कूलचे नाव गुणवत्ता यादीत झळकले.त्याबद्दल कौतुक व्यक्त केले तसेच शाळेत शिक्षिका चांगले शिकवत असल्याने अजूनपर्यंत मुलाला बाहेर क्लास लावण्याची गरज पडली नाही असे म्हणत पुन्हा एकदा सर्व शिक्षिकांचे आभार व अभिनंदन व्यक्त केले.यानंतर शाळेचे शिक्षक संस्थापक अध्यक्ष कानडे सर यांनी स्कॉलरशिप परीक्षेत सर्व पात्र झालेल्या विद्यार्थीचे अभिनंदन व्यक्त केले.तसेच समर्थ स्कॉलरशिप गुणवा यादीत १२ आल्याने सर्व मार्गदर्शक शिक्षिकांचे व समर्थ चे अभिनंदन केले तसेच ध्येय निश्चित करा म्हणजे यश प्राप्त होईल असे सांगितले या सत्कार समारंभाप्रसंगी इ.१० वी चे विद्यार्थी देखील उपस्थित होते.समर्थ व साहील त्यांनी कष्ट व मेहनतीने यश मिळवले व यशस्वी होण्या साठी ध्येय निश्चित करून कष्ट करावे लागतात तरच यश मिळते हा मोलाचा संदेश १० वीच्या विद्यार्थ्यांना दिला व चि०साहील व चि समर्थ ला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या एज्यु डायरेक्टर यांनी चि.साहील व समर्थ या दोघां- नीही हा कठिण परीक्षा दिल्या व त्यात यश संपादन केले. तसेच हया परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या कुटुंबियांनी योग्य ती काळजी घेतली म्हणून चि.समर्थ व चि. साहील यशस्वी झाले असे आपल्या भाषणातून सांगितले व चि०साहील व चि. समर्थ हयांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.उपस्थितांचे आभार शिक्षिका सौ.अस्मिता घोरपडे यांनी आभार मानले, कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् हया गीताने झाली.या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन शिक्षिका सौ. पल्लवी चोरगे यांनी केले.
