धर्मवीर कामगार सेनेच्या अहमदनगर जिल्हा महिला संघटकपदी सुरेखा आंधळे यांची नियुक्ती
अहमदनगर प्रतिनिधी(दि.२७ जुलै):-कामगार व तसेच सरकारी कर्मचारी यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या धर्मवीर कामगार सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिसेविका सौ.सुरेखा भुजंगराव आंधळे यांची धर्मवीर कामगार सेना महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्हा महिला संघटक पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन तसेच शासकीय रुग्णालयातील रुग्णांचे व तसेच पारिचारीकांचे प्रश्न सोडवण्यात सौ.आंधळे या कायम अग्रेसर असतात.त्याचीच पावती म्हणून धर्मवीर कामगार सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ.प्रियंकाताई गाडे यांनी आंधळे यांची जिल्हा महिला संघटक म्हणून नियुक्ती केली आहे. यावेळी प्रियंका गाडे म्हणाल्या की सुरेखा आंधळे या आपल्या पदाच्या माध्यमातून गोरगरीब व श्रमिक वर्गाच्या सुरक्षेसाठी कायम प्रयत्न करीत राहतील.सौ.सुरेखा आंधळे यांची जिल्हा महिला संघटकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सौ.गाडे यांनी त्यांचा सत्कार केला.