चोरी करताना वृद्धावर गोळीबार करणारा व तसेच तब्बल १६ गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२८ जुलै) पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे जबरी चोरी करताना गावठी कट्टयातुन वृध्दावर गोळीबार करणाऱ्याला आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.पथक अहमदनगर शहर परिसरात फरार पाहिजे आरोपींची माहिती घेताना दिनांक 27 जुलै रोजी पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की,आरोपी नामे मिलींद भोसले व त्याची बायको असे शिरुर जिल्हा पुणे गु.र.नं. 565/2023 भादविक 397, 454, 380,34 सह आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे दाखल घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी नगर सोलापुर रोडने अहमदनगरच्या दिशेने येत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले.पथकाने लागलीच नगर सोलापुर रोड, चाँदणी चौक,अहमदनगर येथे जावुन वेशांतर करुन सापळ लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात बातमीतील वर्णना प्रमाणे एक संशयीत इसम व महिला हातात पिशवी घेवुन येताना दिसले.पथकाची खात्री होताच त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)मिलींद ऊर्फ मिलन्या ईश्वर भोसले वय 25 व 2) कोमल मिलिंद भोसले वय 20 दोन्ही रा.बेलगांव,ता. कर्जत असे सांगितले. त्यांचेकडे वरील प्रमाणे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवुन लागले त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल चौकशी करता त्याने त्याचा साथीदार नामे अटील ऊर्फ अटल्या ईश्वर भोसले रा. बेलगांव,ता.कर्जत (फरार) यांनी आलेगाव पागा,ता. शिरुर जिल्हा पुणे येथील जांभळकर वस्तीवर जावुन घरफोडी चोरी केली असुन चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आलो असल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेतले.आरोपी नामे मिलींद ऊर्फ मिलन्या भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर,बीड व पुणे जिल्ह्यात खुनासह दरोडा,दरोडा तयारी,जबरी चोरी,घरफोडी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण 16 गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/सुनिल चव्हाण,दत्तात्रय गव्हाणे,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे,विशाल गवांदे, फुरकान शेख,पोकॉ/रोहित मिसाळ,शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव,अमोल कोतकर,बाळासाहेब गुंजाळ, भाऊसाहेब काळे,किशोर शिरसाठ,बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड, मपोना/भाग्यश्री भिटे, मपोकॉ/ज्योती शिंदे व चापोना/भरत बुधवंत यांनी केलेली आहे.