अहमदनगर प्रतिनिधी:-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या तिसरा वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे शिक्षण मंत्रालय व कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे 29 जुलै 2023 ते 30 जुलै 2023 या दिवशी अखिल भारतीय शैक्षणिक परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर केंद्रीय विद्यालयात क्रमांक १ येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय विद्यालय ओझरचे प्राचार्य खेमेंद्र तोंडवल,अहमदनगर केंद्रीय विद्यालय क्रमांक २ चे प्रतिनिधी लेफ्टनंट कर्नल J S धूल,अहमदनगर केंद्रीय विद्यालय क्रमांक १ चे नायब सुभेदार अवतार चांद,अहमदनगर केंद्रीय विद्यालय क्रमांक १ चे प्रभारी प्राचार्य राकेश कुमार,MIR C केंद्रीय विद्यालय क्रमांक २ चे प्राचार्य सुरेश यादव,VRDE केंद्रीय विद्यालय क्रमांक ३ चे सम्राट कोहली यांच्यासह बुऱ्हाणनगर जिल्हापरिषद शाळेचे मुख्यध्यापक अनिल आंधळे,प्राचार्या पराग अग्रवाल,प्राचार्या सोनाली धूल यांची प्रमुख उपस्थिती होती.यापूर्वीच्या कोठारी आयोगाच्या शैक्षणिक धोरणानुसार 10+2+3 अशी शिक्षण पद्धती अस्तित्वात होती.या शिक्षण पद्धतीत बदल करून 2020 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 5+3+3+4 अशी रचना सुरू करण्यात आली आहे.तीन ते सहा वर्षाच्या वयोगटातील बालवाटीका सारख्या कोर्सच्या माध्यमातून मुलांचा पाया मजबूत करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे. 2025 पर्यंत पायाभूत गणित साक्षरता शंभर टक्के संपादित शिक्षण क्षेत्रातील गळती शून्य टक्के करणे,सर्वसमावेशक शिक्षण पद्धती लागू करून दहावीनंतरच्या शिक्षणात विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार कला,वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील कोणताही विषय निवडून शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.29 जुलै 2020 पासून ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कार्यान्वित करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण क्षमतांच्या विकासासाठी समाजोपयोगी नागरिकाचे निर्माण व संवर्धणासाठी ही राष्ट्रीय शिक्षण प्रणाली 2020 खूप लाभदायक झाल्याची दिसून येत आहे.
