अहमदनगर प्रतिनिधी (दि.२९ जुलै):-नगर तालुक्यातील बु-हाणनगर येथून जेसीबी चोरणा-या टोळीला पकडण्यात भिंगार कॅम्प पोलीसांना यश आले असून पोलिसांनी दोन आरोपीस 22 लाख रू.चा जेसीबीसह अटक केली आहे.या बाबत माहिती अशी की,दि.26 जुलै रोजी फिर्यादी किसन हनुमंत कर्डीले वय 52 वर्षे रा. बाणेश्वर मंदीर मागे, बु-हाणनगर ता.जि.अहमदनगर यांचे मालकीचा 22,00,000/- (बावीस लाख रू)किं.चा जेसीबी कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचे फायद्याकरीता चोरून नेला आहे या फिर्यादी वरून भिंगार कॅम्प पोस्टे येथे गुरनं 475/2023 भादविक 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.भिंगार कॅम्प पोस्टेचे सपोनि. श्री.दिनकर मुंडे यांना गोपनिय माहीती मिळाली चोरीस गेलेला जेसीबी हा देढगाव ता.नेवासा जि.अहमदनगर येथे आहे अशी माहीती मिळाल्यावरून कॅम्प पोस्टेचे तपास पथक मधील अंमलदार अशांना सदर ठिकाणी जावून खात्री करून जेसीबी व आरोपी यांना ताब्यात घेऊन कारवाई करावी असा आदेश देऊन तपास पथक मधील अंमलदार यांनी देढगाव ता. नेवासा जि.अहमदनगर येथे जावून खात्री केली असता सदर दाखल गुन्ह्यातील जेसीबी हा बेवारस स्थितीत मिळून आला.अमलदार यांनी जेसीबी भिंगार कॅम्प पोस्टेला आणला.गुन्ह्याचे तपासादरम्यान व तांत्रीक विश्लेषनाद्वारे अंबादास सोनाजी होंडे व अजित कैलास शेंडगे दोघे रा.पाचुंदा,पोस्ट माका ता.नेवासा जि.अहमदनगर यांनी चोरून नेल्याचे निष्पण्ण झाल्याने 1)अंबादास सोनाजी होंडे वय 30 वर्षे 2)अजित कैलास शेंडगे वय वय 22 वर्षे दोघे रा.पाचुंदा पोस्ट माका ता.नेवासा जि. अहमदनगर यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन सांगीतले कि,आम्ही 1)देवीदास शिवाजी वाकडे 2) सागर शिवाजी वाकडे दोघे रा.लिंबे नादूर ता. शेवगाव जि.अहमदनगर याचे सांगणे वरून सदरचा जेसीबी चोरला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे,सहा.पोलिस निरीक्षक श्री.दिनकर मुंडे, पोहेकाँ/रेवननाथ दहीफळे,पोहेकाँ/संदिप घोडके,पोना/गणेश साठे, पोना/दिलीप शिंदे,पोकाँ/अमोल आव्हाड,पोना/राहुल गुंडू नेम दक्षीण मोबाईल सेल, अहमदनगर यांनी कारवाई केली आहे.
