अहमदनगर प्रतिनिधी (दि.३१ जुलै):-अहमदनगर शहरातून बेपत्ता झालेल्या निवृत्त लष्करी जवानाचा मृतदेह लोणी येथे रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता.दोन दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने तोफखाना पोलीस स्टेशनला आपला पती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.त्यांच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मनोज मोतीयानी व स्वामी गोसावी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.बोल्हेगाव मधील गणेश चौक येथे राहणाऱ्या सुरेखा भोर यांनी आपले पती निवृत्त लष्करी जवान असलेले विठ्ठल भोर हे सापडत नसल्याची तक्रार तोफखाना पोलीस स्टेशनला दाखल केली होती. 29 तारखेला दुपारी चार नंतर त्यांचा फोन लागत नसून ते घरी आले नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. तोफखाना पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी दोन पथके रवाना केली होती.मात्र त्यांचा मोबाईलही बंद असल्याने त्यांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता.रविवारी दुपारी विठ्ठल भोर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोणी तळेगाव रोडचा बाजूला गोगलगाव हद्दीत सापडला.मृतदेह पाहता क्षणी त्यांचा खून झाला असल्याचे स्पष्ट दिसत होते.प्रॉपर्टीचा वादातून हा खुन झालेला आहे अशी नगर शहरात चर्चा सुरू आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/सोपान गोरे,मनोहर गोसावी,दत्तात्रय गव्हाणे,संदीप पवार,देवेंद्र शेलार,रवींद्र कर्डिले,विजय ठोंबरे,विशाल गवांदे,फुरकान शेख,रंजीत जाधव,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके व गुन्हे शोध पथक यांनी केली आहे.
