अहमदनगर प्रतिनिधी (दि.३१ जुलै):-अहमदनगरचे मोहरम हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रसिद्ध आहेत हे मोहरम पाहण्यासाठी राज्यातूनच नाही तर राज्याच्या बाहेरून देखील भाविक येत असतात त्यामुळे गर्दीचे प्रमाणही खूप असते.परंतु गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी मोहरम सण शांततेत पार पाडण्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशनची महत्त्वाची भूमिका असते.आपल्या कर्मचाऱ्यांसह तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री.साळवे हे मोहरमच्या आदल्या दिवशी व मोहरमच्या दिवशी स्वतःसवाऱ्यां मध्ये फिरून प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत होते.व या मोहरममध्येही हिंदू मुस्लिम बांधवांनी दरवर्षीप्रमाणेच ऐक्य दाखवून मोहरम सन शांततेत पार पाडला.मोहरममध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त पुरविला म्हणून मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक मधुकर साळवे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सय्यद साबीर अली अध्यक्ष हाजी हमिद तकिया ट्रस्ट,ॲड.समीर पटेल,वजीर सय्यद,साहेबान जागीरदार,पत्रकार वहाब सय्यद,शहानवाज शेख,बारा इमाम कोठला ट्रस्टचे विश्वस्त मा.नगरसेवक सय्यद सादीक आदी उपस्थित होते.
