अहमदनगर प्रतिनिधी (दि.३१ जुलै):-चारीत्र्याचे संशयावरुन पत्नीचा चेहरा विद्रुप करुन आत्महत्यास प्रवृत्त करणा-या आरोपीस नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथून अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.घटनेतील सविस्तर माहिती अशी की,दि.२९ जुलै रोजी फिर्यादी प्रितीलता गौरपद मिस्त्री (वय ४८ वर्ष रा. विजयनगर पोस्ट कालिनगर ता.मुलचेरा जि.गडचिरोली) यांनी फिर्याद दिली की,दि. २० जुलै ते दि. २८ जुलै रोजी रात्री ०८/०० वा चे दरम्यान सुभाष दांगट यांचे भाडयाचे खोलीत वनराई कॉलनी ता.जि.अहमदनगर येथे यातील आरोपीताने त्याची मयत पत्नी बबिता मिरीनमय मृधा वय वर्ष २९ मूळ रा.कालिनगर ता. मुलचेरा जि.गडचिरोली हल्ली राहणार सुभाष दांगट यांचे भाडयाचे खोलीत वनराई कॉलनी ता.जि.अहमदनगर हिस तु माझ्याकडे अहमदनगर येथे राहत नाही तुझे गावाकडे कोणाशी तरी लफडे आहे.म्हणुन तु माझ्याकडे अहमदनगर येथे राहत नाही असे म्हणुन यातील मयत हिस वेळोवेळी लोखंडी रॉडने मारहाण करुन तिचे डोके फोडले तसेच यातील मयत हिस दारु बळजबरीने पिण्यास लावत असे तिला जेवायलाही देत नसत मारहाणीमध्ये यातील मयत हिचे डोक्याचे केस उपटलेले आहेत.असे म्हणुन तिचा वेळोवेळी मानसिक शारीरिक छळ करुन तीस फाशी घेवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिनं/६८९/२०२३ भादविक/३०६, ४९८ (अ) ३२३,५०४,५०६ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि/राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की,सदर गुन्हयातील आरोपी नामे मिरीनमय निहार मृधा हा मनमाड येथे असल्याची गोपनीय माहिती सपोनि राजेंद्र सानप यांना मिळाली त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना मनमाड जि.नाशिक येथे पाठविले.पोलीस पथकांने मनमाड येथुन सदर आरोपीला सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले.त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मिरीनमय निहार मृथा (वय-३५ वर्ष राहणार कालिनगर ता.मुलचेरा जि.गढचिरोली) असे सांगीतले.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, श्री.संपराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोसई/दिपक पाठक,पोसई/योगेश चाहेर, पोना/बंडु भागवत,पोना/ संदीप चव्हाण,पोना/नवले,पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/नवनाथ दहिफळे यांनी केली आहे.
