स्नेहबंधच्या वतीने गोरगरिबांना दिली मायेची छत्री भेट…अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे यांचा उपक्रम…
नगर प्रतिनिधी (दि.३१ जुलै):-स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरातील विविध भागात फिरून गोरगरीब रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्र्या भेट दिल्या.अचानक मिळालेल्या या भेटीने गोरगरिब वंचित लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.नगर शहरात स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.सध्या पावसाळा सुरू असून रस्त्यावर राहणारे बेघर,निराधारांना दरवेळी पावसात कुडकुडत भिजण्याची वेळ येते.त्यांची ही समस्या लक्षात घेऊन स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे यांनी गरिबांना छत्री वाटपाचा निर्णय घेतला.त्यानुसार स्नेहबंधचे डॉ.उद्धव शिंदे यांच्यासह अमोल बास्कर,हेमंत डाकेफळकर,स्वयंम बास्कर यांनी भिंगार व नगर शहर परिसरात फिरून वंचित व गरीब गरजुंना पावसापासून बचावासाठी छत्र्यांचे वाटप केले.या अचानक मिळालेल्या मायेच्या छत्री भेटीने गरीबांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.यावेळी स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे म्हणाले,स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने नेहमी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.यातून खऱ्या गरजुंना मदत मिळावी,हा हेतू आहे.जे वंचित आहेत,गरीब आहेत अशांना आपल्या माध्यमातून काही तरी मदत मिळावी,या हेतूने पावसाळा सुरू असल्याने गरीबांना छत्री वाटपाचा निर्णय घेतला.राजेंद्र नागपुरे यांच्या वतीने छत्र्या देण्यात आल्या.यापुढेही फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील,असे डॉ.शिंदे यांनी सांगितले.