व्हायरल हिपॅटायटीस बाबत जागरूकता वाढवणे महत्त्वाचे डॉ.संजय घोगरे जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय
अहमदनगर(प्रतिनिधी ३० जुलै):-जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त,हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजय घोगरे जिल्हा शल्य चिकित्सक,प्रमुख पाहुणे डॉ.बापूसाहेब नागरगोजे जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.संतोष पालवे पोटविकार तज्ञ,डॉ. अविनाश आहेर,जिल्हा क्षयरोग अधिकारी,डॉ.सुवर्णमाला बांगर निवासी वैद्यकीय अधिकारी,डॉ.साहेबराव डावरे अतिरिक्त शल्यचिकित्सक,डॉ.दर्शना बारवकर,डॉ.मनोज घुगे रुग्णालय व्यवस्थापक,यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमास डॉ.सुमया खान,डॉ.रश्मी पोखरणा, श्रीमती छाया जाधव मेट्रन,डॉ.विक्रम पानसंबळ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी,श्री. शिवाजी जाधव,जिल्हा कार्यक्रम आधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष,हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम संजय दहिवाळ आदी मान्यवर उपस्थित होते.हिपॅटायटीस बाबत जागृती वाढवणे महत्त्वाचे आहे.कावीळ झाल्यास विविध आजारांचा सामना करावा लागतो विविध समस्यांना सामोरे जावे लागते यासाठी जनजागृती वाढवणे रुग्णांच्या तपासण्या करून घेणे. सतत आजारी पडत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणे महत्त्वाचे आहे यावर मार्गदर्शन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हिपॅटायटीस दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.इतर अधिकारी नर्सिंग प्रशिक्षण केंद्र विद्यार्थिनी व कर्मचारी उपस्थित होते.तर सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रमाचे संजय दहिवाळ, शामल गायकवाड, निकिता असलकर, अमृतवाहिनी संस्थेचे सागर विटकर,सोनाली झरेकर,संपूर्ण सुरक्षा केंद्राचे वाळू इदे,सागर फुलारी,वैशाली कुलकर्णी, अरबाज शेख,दिनेश लोंढे,एकात्मिक सल्ला समुपदेशन व तपासणी केंद्राचे शर्मिला कदम,तृप्ती मापारी,साथीचे सुनील धलपे,वाय. आर.जी चे राहुल खैरनार,आदी जणांनी परिश्रम घेतले.