अमरधामातील अंत्यसंस्कार ओट्यांवरील लोखंडी जाळ्या तात्काळ बदलुन नविन बसविण्यात याव्यात नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे महानगरपालिका आयुक्तांना पत्र
नगर प्रतिनिधी (दि.१६. डिसेंबर):-अहमदनगर महानगरपालिकेचे जेष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी अमरधाम बाबतीत झालेली दुर्दशा पाहता दि.१४ डिसेंबर रोजी महानगरपालिका आयुक्त यांना एक पत्र दिले आहे त्या दिलेल्या पत्रात म्हटले आहे की अमरधाम येथे मृत झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करणेकरीता ओटे बांधण्यात आले असुन सदर ओट्यांवर लोखंडी जाळ्या बसविण्यात आलेल्या आहेत.तथापि सदरील लोखंडी जाळ्या ह्या खराब झालेल्या असुन ठिकाठिकाणी तुटलेल्या आहेत.लोखंडी जाळ्या खराब झालेल्या व तुटलेल्या असल्यामुळे मृतदेह जाळतांना लाकडे ढासळतात मृतदेहाचा भाग बाहेर येतो व त्यामुळे मृतदेह अर्धवट जळला जावुन मृतदेहाची विटंबना होत आहे.तरी वरील बाबींचा विचार करता अमरधाम येथील अंत्यसंस्काराचे ओट्यांवरील लोखंडी जाळ्या तात्काळ नविन बसविणे बाबत संबंधितांना आदेश देण्यात यावेत व वरील कारणामुळे होणारी मृतदेहांची विटंबना थांबविण्यात यावी.असे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.