Maharashtra247

बांधकाम कामगार नसताना सुद्धा बोगस नोंदणी करून प्रमाणपत्र देणाऱ्या बांधकाम अभियंता व ग्रामसेवकावर कारवाई करण्याची तहसीलदारांकडे मनसेची मागणी येत्या आठ दिवसात कारवाई करावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण-मनसे नेते अविनाश पवार  

पारनेर प्रतिनिधी (दि.१५. डिसेंबर):-बांधकाम कामगार खरे लाभार्थी योजनेपेसुन वंचित ठेऊन बांधकाम कामाशी कसलीही संबंध नसताना सुद्धा पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदणी करून ९०० ते १३०० रुपये रक्कम घेऊन बांधकाम अभियंता यांनी संगनमत करुन खरा लाभार्थी योजनेपेसुन वंचित ठेऊन बांधकाम कामगार नसताना सुद्धा बोगस प्रमाणपत्र तसेच ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी बोगस दाखला देऊन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी बांधकाम अभियंता तसेच ग्रामसेवक यांनी संगनमत करुन बांधकाम कामगारांच्या बोगस नोंद करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी त्वरित चौकशी करुन संबंधित ग्रामसेवक यांची निलंबनाची कारवाई करुन कामगार नसताना सुद्धा बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी करणारे बांधकाम अभियंता यांनी कामगार नोंदणी करण्यासाठी ९००ते १३००रुपये वसुली केली असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त झाली आहे.संबंधित प्रकरणाची चौकशी केली असता बोगस नोंदणी करणारे एजंट सुद्धा पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे शासनाची दिशाभूल करीत बोगस प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणुक केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पारनेर तहसीलदार यांना निवेदन देऊन सखोल चौकशी करून दोषीं बांधकाम अभियंत्याचा परवाना कायम स्वरुपी रद्द करावा व बोगस लाभार्थी ना संबंधित योजनेचा दिलेला लाभ वसुल करुन त्याच्यावर आठ दिवसांत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी केली आहे जर येत्या आठ दिवसांत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांच्या कार्यालयात उपोषण करण्यात येणार असल्याचे माथाडी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अविनाश पवार यांनी सांगितले.यावेळी सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के,जिल्हा उपअध्यक्ष मारुती रोहकले तसेच पारनेर तालुका उपअध्यक्ष सतीश म्हस्के सह महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page