अहमदनगर (दि.८ ऑगस्ट):-कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांचा पिकअप कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट येथे मंगळवारी रात्री पकडला,पिकअपसह सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,तीन गोवंशी जनावरांची सुटका करण्यात आली आहे.आफताब हारुण शेख (वय २२ वर्षे रा.घोडेगाव,ता.नेवासा जि.अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे पथकासह रात्र गस्तीवर असताना कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांचा पिकअप झेंडिगेट येथे येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यादव आणि गुन्हे शोध पथकाने (एम.एच.२० ए. टी. ७२५८) पांढऱ्या रंगाच्या पिकअपला पकडले. त्यामध्ये दोन जर्शी गाई व एक वासरु कत्तलीसाठी आणल्याचे आढळून आले. आफताब हारुण शेख राहणार घोडेगाव तालुका नेवासा याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (ब) ९ सह प्राणी क्लेष प्रति अधि १९६० चे कलम ११ प्रमाणे पोलीस शिपाई अमोल दिलीप गाढे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश धोत्रे पुढील तपास करीत आहेत.कोतवाली पोलिसांनी १ मार्च पासून आतापावेतो वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर छापे टाकून १९ गुन्हे दाखल करून ५१,१७,०४५ रू चा माल जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कालकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस अंमलदार गणेश धोत्रे,सतिष भांड, योगेश भिंगारदिवे,रियाज इनामदार,सलीम शेख, सुजय हिवाळे,अमोल गाढे,संतोष जरे यांनी केली आहे.
