राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या स्वाभिमान सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे:विवेक कुचेकर
आष्टी प्रतिनिधी/गोरख निकाळजे:-राष्ट्रवादी काँग्रेस मधील मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार महाराष्ट्रात ठीक ठिकाणी सभा घेत आहेत.बीड शहरामध्ये गुरुवार दि.१७ ऑगस्ट रोजी खा.शरद पवार यांची स्वाभिमान सभा होत आहे.देशात व राज्यात जाती जातींमध्ये धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले आहे.देशात अराजकता माजवण्याचे काम ही सुरू असुन फोडा फोडीच्या राजकारणामुळे राज्यातील सामान्य नागरिक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.विचारधारा सोडुन जातीयवादी शक्तींना पाठबळ देणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची स्वाभिमान सभा बीड याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. पुरोगामीत्व जिवंत ठेवण्यासाठी व शरदचंद्रजी पवार यांचे हात बळकट करण्यासाठी स्वाभिमान सभेला शेतकरी, कष्टकरी,कामगार,ओबीसी,आदिवासी,भटके विमुक्त, बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवानेते विवेक कुचेकर यांनी केले आहे.