राहुरी प्रतिनिधी (दि.१६ ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील कात्रड येथील एकाने कौटुंबिक वादातून पत्नी व सासू यांच्यावर टणक हत्याराने डोक्यात प्रहार करुन खून केला होता.यातील संशयित आरोपी सागर सुरेश साबळे पसार झाला होता परंतु पोलीस पथके त्याचा शोध घेत होते.कात्रड येथे कौटुंबिक वादातून नूतन सागर साबळे (वय २३) व तिची आई सुरेखा दिलीप दांगट (वय ४५) या दोघींचा खून झाला.सागर साबळे हा घरजावई आहे.काल त्यांच्या घरात आधिकमास निमित्ताने धोंडा कार्यक्रम होता.मात्र, एमआयडीसी नगर मध्ये नौकरीला असलेल्या सागर साबळे यास कंपनीत कामासाठी जावे लागले.तो कार्यक्रमास हजर नव्हता. रात्री सागर घरी आला तेव्हा नूतन व तिची आई दोघी झोपेत असतानाच टणक हत्याराने प्रहार करून त्यांचा खून केला,अशी माहिती पुढे येत आहे.घटनेनंतर आरोपी पसार झाला.जाताना त्याने त्याची छोटी मुलगी शेजारी भावाकडे नेऊन ठेवली.त्याचा भाऊ आणि आई एक किलोमीटर अंतरावर स्वतंत्रपणे रहातात.अचानक छोट्या मुलीला घरी आणून का सोडले,हा प्रश्न सागर साबळे याचे भावाला व आईला पडला.रात्री अकराचे सूमारास सागरचा भाऊ छोट्या मुलीला तिच्या आईकडे सोपविण्यासाठी म्हणून आला.तेव्हा त्याला या दोघी मायलेकी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.त्याने तत्काळ आरडाओरडा केला.राहुरी पोलिसांना फोन केला.पोलीस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे,पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजीव लोखंडे,उपनिरीक्षक सुरेश खोंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.सागर साबळे पसार असल्याने त्याच्यावर संशयाची सुई आहे.या प्रकरणात संशयित आरोपी असलेला सागर सुरेश साबळे पसार झाला होता.आज दि.१६ ऑगस्ट रोजी दुपारी धनगरवाडी शिवारात त्याचे प्रेत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले.तो काल रात्रीपासून पसार होता.या दूहेरी खून प्रकरणी घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट देवून तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली होती. मात्र,संशयित आरोपी सागर साबळे याचे प्रेत धनगरवाडी शिवारात झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले.