राहुरी प्रतिनिधी:-समाजातील गोरगरीब व पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठेतरी संपर्क कार्यालय असावे ही संकल्पना खूप दिवसांची ती आज प्रत्यक्षात साकार होतेय याचा खूप मनातून आनंद होतोय असे वक्तव्य आरपीआय तालुकाध्यक्षा सुरेखाताई सांगळे यांनी संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

सांगळे यांनी गोरगरीब व पिडीत महिलांचा विचार करून आज हे पाऊल उचलले.ही गोष्ट अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन आरपीआय तालूकाध्यक्ष विलास साळवे यांनी केले.राहुरी येथील आरपीआय महिला आघाडी तालूकाध्यक्षा स्नेहल सांगळे यांनी त्यांच्या संकल्पनेतून गोर गरीब व पिडीत महीलांना न्याय मिळवून देण्यासाठी राहुरी येथे आरपीआय आठवले गटाचे संपर्क कार्यालयाला सुरूवात केली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आरपीआय तालूकाध्यक्ष विलास साळवे यांच्या हस्ते फित कापून या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी विलास साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक रिपाइंचे जिल्हा संघटक अनुसंगम शिंदे यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यालयाचा उद्देश,समाजात महिलांवर होणारे अन्याय,त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे कार्यालय सतत प्रयत्नशील राहील. अशी ग्वाही दिली.या उदघाटन प्रसंगी विभागीय अध्यक्ष भिमा बागुल,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रविण लोखंडे,पप्पू बनसोडे,तालुका अध्यक्ष विलास साळवे,धनंजय निकाळे,गडाख पाटील,सागर साळवे आदींनी मनोगत व्यक्त करून स्नेहल सांगळे यांना पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास गोविंद दिवे,अतुल त्रिभुवन,नंदू सांगळे,डॉ.विजय मकासरे, राजू आढाव,राजू बागुल,मयूर सूर्यवंशी,नविन साळवे,पंछी शिरसाठ,कुंदन आरोळे,रतन गायकवाड,नायब तहसीलदार पुनम दंडीले,रूकसाना शेख, प्रियंका सगळगिळे,अलका भोसले,सवीता भोसले, मनीषा भोसले,वंदना सगळगीळे आदींसह तालूक्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष स्नेहल सांगळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे तर आभार प्रदर्शन आरपीआयचे तालूका उपाध्यक्ष सुनिल चांदणे यांनी व्यक्त केले.
