जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी पाईप चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद;तब्बल ३४ लाख रुपयांचे पाईप जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर (दि.१७ ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेची लोखंडी पाईप चोरी करणारी आंतरराज्य टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.बातमीतील हकीकत आशिकी,यातील फिर्यादी सचिन शरद रेवगडे(साईट इंजिनिअर) रा.हिवरगाव आंबरे ता.अकोले यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून तालुक्यातील तळेगाव दिघे व इतर वीस गावांचा जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते त्या कामावरील ४३,०५,५२३ रुपये किमतीचे लोखंडी पाईप कोणीतरी अनोळखी इसमानी चोरून नेले होते.यावरून संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये गुरन ७२६/२०२३ भादविक ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरील चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेतील पथक तपास करत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी पाईप गोरीगंज उत्तरप्रदेश राज्य येथील शिवकुमार सरोज व त्याचे इतर साथीदार यांनी चोरी केले आहे व ते त्यांच्या राहत्या घराजवळ ठेवले आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवून पंचांना सोबत घेऊन नमूद ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करणे बाबत कळविले.पथकाने उत्तरप्रदेश मध्ये गौरीगंज येथे जाऊन शिवकुमार नानकाऊ सरोज,अर्शद हसन खान,मोबिल जगमाल खान,अहमद उस्मान खान,खलील मोहम्मद इसराइल खान,सुनील राम अवतार कुमार,खुर्शीद मंगल खान,मोहम्मद आरिफ जोरमल,तय्यब मंगल खान (सर्व रा.मेवात हरियाणा राज्य) यांना अटक केली.तर हसीम बसरू खान,अलीम करीउद्दीन खान,मोहम्मद अफजल जोरमल,तिन्ही रा.नुह,राज्य हरियाणा,ताजमहंमद रहमान,रईस हिसाब खान (फरार) अशा साथीदारांसोबत चोरी केल्याची कबुली दिली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग सोमनाथ वाघचौरे,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/मनोहर गोसावी,दत्तात्रय गव्हाणे,देवेंद्र शेलार,पोना/रवींद्र कर्डिले,सचिन आडबल,संतोष लोंढे,विजय ठोंबरे,फुरकान शेख,संतोष खैरे,अमृत आढाव,रोहित मिसाळ,किशोर शिरसाट,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड यांनी केली आहे.