उत्तम आरोग्य ही काळाची गरज..संपूर्ण सुरक्षा केंद्र आयोजित आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर (दि.१७ ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्था,जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय अहमदनगर,स्नेहालय संपूर्ण सुरक्षा केंद्र, एकात्मिक सल्ला व समुपदेशन तपासणी केंद्र यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व जनजागृती कार्यक्रम प्रेमदान हडको सावेडी या भागात घेण्यात आला.नगरसेविका आशाताई कराळे,शर्मिला कदम,बाळू इदे,तृप्ती मापारी,सागर फुलारी,वैशाली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.शिबिराप्रसंगी बोलताना शर्मिला कदम,बाळू इदे,सागर फुलारी,म्हणाले की महिला व पुरुषांमध्ये आरोग्याचे वाढते प्रमाण असून उपस्थित महिला व पुरुषांना आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी योग्य आहार व्यायाम,ताणतनावाचे नियोजन,वजन नियंत्रण ठेवणे,यासोबत मधुमेह व रक्ताच्या विविध तपासण्या का करणे गरजेचे आहे.आहार घेताना संतुलित आहार घ्यावा ज्यातून प्रथिने व कर्बोधके शरीराला मिळतील आणि आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.तसेच आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण रक्तांमध्ये आढळणारी कमतरता वेळोवेळी तपासून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था व स्नेहालय संस्थे अंतर्गत संपूर्ण सुरक्षा केंद्र मार्फत पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुविधा यावर मार्गदर्शन केले.रक्त तपासणी बाबत कोणकोणत्या चाचण्या केल्या जातील याबाबत तृप्ती मापारी यांनी माहिती दिली.या शिबिरात 125 लोकांनी लाभ घेतला तर त्यापैकी 95 लोकांनी रक्त तपासणी केली.शिबिरात उच्च रक्तदाब वजन,मधुमेह,एच.आय.व्ही.कावीळ आदी तपासण्या करण्यात आल्या.शिबिर यशस्वीतेसाठी करण कराळे,सौ.मेघाताई डहाळे,श्री.गौरव जाधव,श्री.शैलेश कराळे,सौ.छायाताई केदारे,श्री.प्रतिक डहाळे,श्री.रुपेश वाकडे, विनायक केदारे,शंकराव जाधव,यांनी परिश्रम घेतले तर अंगणवाडी सेविका सौ.भारती भगत यांनी आभार व्यक्त केले.