नगर शहरात या ठिकाणी बिबट्याचे झाले दर्शन
नगर प्रतिनिधी (दि.१७ ऑगस्ट):-नगर शहरातील धर्माधिकारी मळा,पंपिंग स्टेशन,सावेडी परिसरामध्ये नुकतेच बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
या भागात तोफखाना पोलिसांनी नागरिकांना घरात रहाण्याचे आवाहन केले असून हा परिसर आता जवळपास निर्मनुष्य झाला आहे.धर्माधिकारी मळा, बालिकाश्रम रोड परिसरात सध्या उसाची शेती असल्यामुळे त्या ठिकाणी बिबट्याचा वावर असून या बिबट्यामुळे मात्र नगरकर भयभीत झाले आहेत.वन विभागाचे पथक थोड्याच वेळाने येणार असल्याची माहिती समजतेय.