संगमनेर प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):-संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे अक्षदा ट्रेडिंग कंपनी तसेच हिंदुस्तान फीड्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने येथील ५५० विद्यार्थ्यांना २५०० हून अधिक मोफत वह्यांचे वितरण केले.

हिंदुस्तान फीड्स कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर रवींद्र पवार,तसेच सेल्स ऑफिसर सचिन आदिक,अक्षदा ट्रेडिंग कंपनीचे संस्थापक अध्यक्ष तसेच हिंदुस्तान फिडस कंपनीचे अधिकृत विक्रेता व डीलर संजय गोडगे पाटील व चिंचोली गावचे सरपंच विलास अण्णा सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विलास मास्तर सोनवणे,डॉ.विवेक गोडगे,विनोद गोडगे,सोमनाथ आभाळे,सोमनाथ सोनवणे, अप्पासाहेब गोडगे,प्रकाश गोडगे,माधव अण्णा गोडगे,सतिश सोनावणे,सतिश गोडगे,विजय गोडगे,अशोक गोडगे,शैलश गोडगे,डॉ.सुहास अभाळे,दत्तात्रय सोनवणे,योगेश प्रकाश सोनवणे,यासह रयत शिक्षण संसथेचे श्री.छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खळवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली गुरव या सर्व शाळेतील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक वृंद,विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ,विवीध संस्थांचे मान्यवर,पदधिकारी मोठ्या संख्येने अक्षदा ट्रेडर्स व हिंदुस्थान फिडस कंपनीच्या माध्यमातून मोफत वह्या वितरण कार्यक्रमासाठी हजर होते.याप्रसंगी हिंदुस्तान फीड्स कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर रवींद्र पवार यांच्याशी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांचे आभार मानले.
