Maharashtra247

माहेरहून २५ हजार रुपये घेऊन येण्यासाठी सततच्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

श्रीरामपूर प्रतिनिधी (दि.१८. डिसेंबर):-येथील विवाहितेस दारूच्या नशेत मारहाण करून माहेरहून २५ हजार रुपये आणण्यासाठी कायम होणाऱ्या छळाला कंटाळून प्रियंका सतीश पवार (वय २२,रा.उक्कलगाव) हिने आत्महत्या केली असल्याची फिर्याद मंगल शाहू गायकवाड (रा.रमानगर दत्तनगर) हिने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.मंगल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत प्रियंका सतीश पवार ही माझी नात असून, तिचा पती सतीष बापू पवार हा नेहमी दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करून माहेरहून २५ हजार रुपये घेऊन येण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत होता.या छळाला कंटाळून १४ डिसेंबरला तिने गळफास लावला होता.तिला उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल,लोणी येथे दाखल करण्यात आले होते.उपचार सुरू असताना १६ डिसेंबरला तिची प्राणज्योत मालवली, असे फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत सतीश बापू पवार याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page