अहमदनगर प्रतिनिधी (दि.१८. डिसेंबर):-भरधाव मोटारसायकलवरून विनयभंग करणाऱ्या रोडरोमीओला जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी ३ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा केली आहे.या घटनेतील आरोपी नामे मिनीनाथ दिलीप चव्हाण (वय २४ वर्षे रा.जीएसपी इंम्पोरीयम अपार्टमेंट,नाना चौक तपोवन रोड) याने पिडीत फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही गंगा उदयान रोडने तिच्या भावासोबत सायकलवरून घरी जात असताना तिचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील श्रीमती.माधुरी एच.मोरे मॅडम अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून भा.दं.वि.कलम ३५४,३५४ ( अ ) तसेच लहान मुलांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा २०१२ कलम ८ नुसार दोषी धरून आरोपीस ३ वर्षे सक्त मजुरी व रुपये १,०००/दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील ॲड.मनिषा पी.केळगंद्रे शिंदे यांनी पाहिले तर पैरवी अधिकारी आडसुळ यांनी सहकार्य केले.
Trending Topics:
Trending
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करा..!समस्त मुस्लिम समाजाचा तीव्र निषेध; पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
- 🗞️अहिल्यानगर जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकीची प्रारुप मतदार यादी जाहीर..१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती,सूचना दाखल करण्याचे आवाहन
- प्रभाग क्र.१३ मधून महिला राखीव उमेदवार परविन मनसूर सय्यद उतरणार निवडणुकीच्या रिंगणात..राजकारणासोबत समाजकारणातही आघाडी महिलांसाठी सातत्याने काम करणारी निर्भीड कार्यकर्ता
- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणारा तो इसम 24 तासांत अटकेत..अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
- इतकी हिंमत होतीच कशी..महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला अटक नाही तर आंदोलन पेटेल..! सकल आंबेडकरी समाजाचा इशारा
- अहिल्यानगर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर
- अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध मद्यविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत वाढ..
- पाटेवाडीतील मृत आदिवासी महिलेच्या प्रेताची विटंबना.. आरोपींना अटक न झाल्यास वंचित चा ठिय्या आंदोलनाचा इशारा!