अहमदनगर (प्रतिनिधी)- शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने तपोवन रोड येथील मतीमंद मुलांच्या निवासी शाळेत दि.१७ डिसेंबर रोजी अन्न-धान्याची मदत करण्यात आली व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. प्रगतशील शेतकरी कै.शंकर भाऊ वाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक संतोष वाणी, उद्योजक गणेश वाणी,किरण लुंगसे,धनंजय तागड, कुंडलिकराव ढवण,प्रशांत शिंदे,अमर निक्रड,चैतन्य वाणी,ओम वाणी,तेजश्री निक्रड,गायत्री वाणी,पूजा वाणी आदींसह वाणी परिवारातील सर्व सदस्य व शंभूराजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी गणेश वाणी म्हणाले की,वाढदिवस,सण,उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रमांना सामाजिक उपक्रमाची जोड दिल्यास वंचितांना आधार मिळणार आहे.वंचित व दुर्बल घटकांना प्रगतशील शेतकरी कै.शंकर वाणी यांनी नेहमीच आधार देण्याचे कार्य केले होते.त्यांच्या विचारांचा वारसा वाणी परिवार व शंभूराजे प्रतिष्ठान सामाजिक योगदानाने चालवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच संतोष वाणी म्हणाले की,प्रत्येकाने सामाजिक जाणीव ठेऊन योगदान देण्याची गरज आहे. दीनदुबळ्यांना आधार दिल्यास समाजातील प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. वडिलांनी देखील गरजूंना मदत करण्याची नेहमीच शिकवण दिली.खर्या गरजूंना मदत मिळाल्यास ती मदत सार्थकी लागते.ही जाणीव ठेऊन हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
Trending Topics:
Trending
- 📰 जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना ‘भारत गौरव – २०२५’ पुरस्कार..विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने गौरव..सामाजिक,प्रशासनिक कार्याबद्दल सन्मान
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करा..!समस्त मुस्लिम समाजाचा तीव्र निषेध; पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
- 🗞️अहिल्यानगर जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकीची प्रारुप मतदार यादी जाहीर..१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती,सूचना दाखल करण्याचे आवाहन
- प्रभाग क्र.१३ मधून महिला राखीव उमेदवार परविन मनसूर सय्यद उतरणार निवडणुकीच्या रिंगणात..राजकारणासोबत समाजकारणातही आघाडी महिलांसाठी सातत्याने काम करणारी निर्भीड कार्यकर्ता
- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणारा तो इसम 24 तासांत अटकेत..अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
- इतकी हिंमत होतीच कशी..महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला अटक नाही तर आंदोलन पेटेल..! सकल आंबेडकरी समाजाचा इशारा
- अहिल्यानगर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर
- अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध मद्यविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत वाढ..