वर्धा प्रतिनिधी (दि.१७. डिसेंबर):-एल.जी.बी.टी.सेल वर्धा जिल्हाअध्यक्ष पदाचा शिवानी सुरकार यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.या राजीनामा पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की ६ डिसेंबर २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वर्धा येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलनात सहभागी झाले असता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी राज्यमंत्र्याबरोबर धरणे आंदोलनात सहभागी झाल्याचा फोटो काही राजकीय लोकांनी व्हाट्सअप ग्रुप वर तसेच सोशल मीडियावर प्रसारित करून चुकीचे वक्तव्य करून माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरविण्यात आली.विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील झाल्यानंतर माझी वर्धा जिल्हा निवडणूक विभागातर्फे निवडणुकी संदर्भात “वर्धा जिल्हा आयकॉन” या पदी नियुक्ती करण्यात आली होती पण धरणे आंदोलनामुळे अवघ्या पाच दिवसातच माझी नियुक्ती रद्द करण्यात आली.वर्धा जिल्हा आयकॉन या पदाची नियुक्ती करते वेळी वर्धा जिल्हा प्रशासनाने माझी कुठल्याही प्रकारची पडताळणी केली नाही,तसेच नियुक्ती रद्द करते वेळी मला कुठल्याही प्रकारच्या सूचना न देता नियुक्ती सुद्धा रद्द केली.कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश करणे आणि गरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणे हा अपराध तर नाही?अशा प्रकारची चर्चा दबल्या आवाजात तृतीयपंथी समूहामध्ये सुर घेत आहे.या सर्व प्रकारामुळे मला मानसिक त्रास होत असून तृतीयपंथी समूहामध्ये नाराजीची भावना व्यक्त होत आहे.तीन ते चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना मी याची माहिती दिली असता मा.प्रविण पेठे यांचे व्यतिरिक्त पक्षातील कुठल्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांतर्फे याची दखल घेण्यात आली नाही व कुठल्याही प्रकारचे सहकार्य मला करण्यात आले नाही.त्यामुळे मला पक्षात कोणतेही सहकार्य मिळत नसल्यामुळे नाईलाजास्तव दि.१६ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस एल.जी.बी.टी. सेल,वर्धा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. असे राजीनामा पत्रात शिवानी सुरकार यांनी नमूद केले आहे.
Trending Topics:
Trending
- अहिल्यानगर पोलिसांची मान उंचावली! एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व हवालदार राजू सुद्रिक यांच्या कर्तृत्वावर ‘अति-उत्कृष्ट सेवा पदका’ ची मोहोर
- घर देतो म्हणत साडेसहा लाखांची केली फसवणूक..न्यायालयाचा आदेश ही धुडकावला..अखेर त्या ३० वर्षीय आरोपीस LCB ने जेलमध्ये धाडला
- साईदरबारी दानाचा महासंगम! श्रावणाच्या मुहूर्तावर शिर्डीत सुवर्णवर्षाव; बंगळुरूच्या भक्ताकडून तब्बल २१ लाखांचे सोने,तर SBI बँकेकडून कडून ७० लाखांची अत्याधुनिक भेट!
- शहर वाहतूक पोलिसांचा धडाका! २७० बेशिस्त चालकांवर अडीच लाखांचा दंड;काळ्या काचा अन् ट्रिपल सीटला नो एन्ट्री! शहरातील दाळमंडई भागातही मोठी कारवाई
- 🔥गोदावरी नदीपात्रात LCB ची मोठी धाड..! ५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त..वाळूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ!
- काळ्या काचा लावून फिरणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी भररस्त्यात शिकवला धडा..!काळ्या काचा अन् नियमांची पायमल्ली करणाऱ्या १५२ गाड्यांवर कारवाई ५६ कारवरून फिल्म जागीच काढली..!
- कराड प्रशासनाचा हलगर्जीपणा ! महिलांचा सन्मान अन् नागरिकांचा जीव धोक्यात.’आदिशक्ती’ चा उपोषणातून पेटला वणवा!भटक्या कुत्र्यांची दहशत अन् रुग्णालयाची दुर्दशा उपोषणाचा आज दुसरा दिवस..!
- स्थानिक गुन्हे शाखेचे मध्यरात्री भयानक ‘कॉम्बिंग ऑपरेशन..हद्दपार सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह घेतलं ताब्यात;मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश!
