हिवरगाव पावसा टोल प्लाझा येथे मंत्री आठवले यांचे उत्साहात स्वागत
संगमनेर प्रतिनिधी / नितीनचंद्र भालेराव:-केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार आठवले नाशिक वरून आळेफाटा मार्गे जात असताना हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थ व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.नामदार आठवले हे नाशिक पुणे महामार्गावरून घारगाव पावसात टोल प्लाझा येथून जाणार असल्याचे समजतात हिवरगाव पावसा आणि परिसरातील ग्रामस्थ महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने जमा झाले. पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा फाट्यावरील अर्ध्या नृत्यांगना पवळा भालेराव हिवरगावकर स्वागत बोर्डाजवळ कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा थांबून पारंपारिक वाद्य, फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले. नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसात टोल प्लाजा परिसरात रात्रीच्या नऊ वाजता मोठ्या प्रमाणात हिवरगाव पावसा व पंचक्रोशीतील ग्रामस्थ महायुतीचे पदाधिकारी मंत्री ना.रामदास आठवले यांची वाट पाहत होते.
रात्री नऊ वाजता तर प्लाझा येथे आद्यनृत्यांगना पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्वागत बोर्डाजवळ कार्यकर्त्यांनी पारंपारिक वाद्यासह फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्याबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर,प्रदेश उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्याचे नेते विजय वाकचौरे सोबत होते.तर महायुतीचे पदाधिकारी भाजपाचे काशिनाथ पावसे,संगमनेर तालुका उपाध्यक्ष गणेश दवांगे, सरचिटणीस केशव दवांगे, शिवसेना जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव,हिवरगाव पावसा सरपंच सुभाष गडाख,सोसायटीचे संचालक अशोक भालेराव,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,सामाजिक कार्यकर्ते आकाश गोडगे,संजय भालेराव,राजू दारोळे, महेंद्र भालेराव, राजू भालेराव,करण दारोळे, गणेश दारोळे, मुकेश दारोळे, छगन भालेराव,यादव भालेराव,प्रल्हाद मोकळ,साई भालेराव,उणवणे मास्तर, यांच्या सह कला सम्राज्ञी पवळा कला मंच,राजे उमाजी नाईक मित्रमंडळ यांचे कार्यकर्ते व हिवरगाव पावसा, झोळे चंदनपुरी,येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
