अहमदनगर मध्ये ४ बांगलादेशी घुसखोरांना केली अटक;तर ६ जण फरार;नाशीक ATS आणी अहमदनगर पोलिसांची कारवाई…
अहमदनगर (दि.२४ ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खंडाळा येथे १० बांगलादेशी नागरीक आपली ओळख लपवून राहत असल्याची माहिती नाशीक येथील ATS पथकाला मिळताच नाशीक ATS आणी अहमदनगर पोलिसांनी खंडाळा येथील क्रेशरवर छापा टाकून कारवाई केली.दरम्यान या संदर्भात अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात मोहीनूद्दीन नाजीम शेख,शहाबुद्दीन जहागिर खान,दिलावर खान सीराज ऊल्लह खान,शहापरान जहागिर खान,या ४ आरोपींना अटक केली असून ६ जण फरार झाले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की नगर तालुक्यातील खंडाळा येथे १० बांगलादेशी नागरीक गेल्या काही दिवसांपासून स्वःतची ओळख लपवून राहत होते.याबाबत नाशीक ATS पथकाला माहिती मिळताच अहमदनगर पोलिसांच्या मदतीने नाशीक ATS ने कारवाई केली मात्र या कारवाई ४ जणांना अटक करण्यात आली असून ६ जन फरार होण्यात यशस्वी झाले आहे.हि कारवाई बुधवारी रात्री उशिरा १ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली असून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींकडुन बनावट पासपोर्ट,आधारकार्ड,पॅनकार्ड,शाळा सोडल्याचा दाखला आढळून आला असून नगर तालुका पोलीस ठाण्यात या चौघांवर कलम 420,465,467,468,471 तसेच भारतामध्ये प्रवेश 3(A) 6(A) 14 नुसार गुन्हा दाखल केला आहे