हार्मनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ॲथलेटिक्स स्पर्धेत यश
अहमदनगर (दि.२५ ऑगस्ट):-सहोदया ग्रुपच्या वतीने आर्मी पब्लिक स्कूल येथे सर्व सीबीएससी शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता दि.21 ते 24 ऑगस्ट दरम्यान भव्य अशा ॲथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आर्मी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या नूतन मिश्रा उपस्थित होत्या.या स्पर्धेमध्ये नगर जिल्ह्यातील अनेक सीबीएससी शाळेंनी सहभाग नोंदवला होता.स्पर्धा चांगल्या रितीने पार पडण्यासाठी विशेष भारतीय सैन्य दलातून पंचांना पाचारण करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये वडगाव गुप्ता येथील त्रावणकोर एज्युकेशन ट्रस्ट संचलित हार्मनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले. यामध्ये 14 वर्षाखालील मुलींमध्ये लांब उडी या स्पर्धेत सिद्धी थोरात हिने सुवर्णपदक पटकावले.तसेच चौदा वर्षाखालील मुलांमध्ये लांब उडी यामध्ये अथर्व धुमाळे याने कांस्यपदक तर सोळा वर्षाखालील मुली 100 मीटर धावणे यामध्ये आर्या चोरगे हिने सुवर्णपदक पटकावले. तसेच सचिन सांगोळगी,दिव्या गीते,आदित्य चोरमले, आदित्य बनसोडे,सुयश आडसुरे,जेनेलिया पगारे,प्रांजल आडसुरे,रिया जाधव,आदिनाथ गुदगळ या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक अमोल ठोंबे यांचे मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेच्या बक्षीस वितरणा प्रसंगी क्रीडा अधिकारी भाऊराव वीर व विशाल गर्जे उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना त्यांनी ॲथलेटिक्स या खेळाविषयी मुलांना बहुमोल असे मार्गदर्शन केले व खेळाचे आयुष्यातील तसेच आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी असणारे महत्त्व पटवून सांगितले. या स्पर्धा पार पाडण्यासाठी आर्मी स्कूलचे क्रीडा शिक्षक भीम पवार तसेच दत्ता भालसिंग व महेश वाघ यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य श्री.अशोक बेरड तसेच सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.